आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Railway Catering And Tourism, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-सेवा बंद पडल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनची(आयआरसीटीसी) ई-सेवा रविवारी सकाळी 10 ते 12.30 वाजेपर्यंत या तत्काळ आरक्षणाच्या वेळेदरम्यान बंद झाल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांनी तिकीट मिळविण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर धाव घेतली. दोन दिवसांपासून या ऑनलाइन सेवेवर तिकिटाचे पैसे जमा होतात, मात्र त्याची नोंद होत नसल्याचा प्रकारही समोर आला आहे. रेल्वेच्या वाणिज्य विभागातील अधिका-यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांना या प्रकरणाची कल्पनाही नव्हती.
रेल्वे बोर्डाने प्रवाशांना घरबसल्या आरक्षण तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी आयआरसीटीसीकडे ई- तिकीट सेवेची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता तत्काळ आरक्षणाच्या वेळेदरम्यान ही ऑनलाइन प्रक्रिया सुरू होत नव्हती. सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती ही सेवा बंद करण्यात आली आहे, असा इंग्रजीतून संदेश येत असल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली होती. ऑनलाइन सेवा बंद असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रवाशांची आरक्षणासाठी गर्दी झाली होती.
संकेतस्थळ सुरू झालेच नाही
आयआरसीटीसीवर दररोज सकाळी 10 वाजेला तत्काळ आरक्षण खुले होते. त्यामुळे रविवारी ऑनलाइन आरक्षण करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेबसाइटच सुरू झाली नाही. मंगेश कपोते, प्रवासी, औरंगाबाद
सेवा बंदचा संदेश
रेल्वेस्थानकावर आरक्षण करण्यासाठी गर्दी असते, म्हणून ऑनलाइन बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर प्रयत्न केले. मात्र, ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे, असा मेसेज येत होता. अभिजित चांदे, नाशिक
इतर शहरांतही सेवा कोलमडली
नाशिकप्रमाणेच नागपूर, औरंगाबाद, मनमाड आणि पुणे या शहरांमध्येही ई- तिकीट सेवा कोलमडल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर आरक्षण करण्यासाठी धाव घ्यावी लागली.