आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाने माझ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानेच पुन्हा मायभूमीचे दर्शन, जवान चंदू चव्हाणचे उद्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सीमारेषा ओलांडून अनवधानाने पाकिस्तानात गेलेला भारतीय लष्करी जवान चंदू चव्हाण नुकताच मायदेशी परतला असून रविवारी (दि. १२) रोजी आजीच्या अस्थी विसर्जनासाठी तो नाशिकमध्ये आला होता. या विधीसाठी चंदू चव्हाण भाऊ, मामा व इतर नातेवाइकांसह उपस्थित होता.  या वेळी अस्थी विसर्जन करताना चंदूला अश्रू अनावर झाले. संपूर्ण देशाने माझ्यासाठी प्रयत्न केल्यामुळेच मला पुन्हा भारतभूमीचे दर्शन घडल्याचेही तो या वेळी म्हणाला.   

‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण हा सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेत गेला होता. पाकिस्तानात गेल्यानंतर चंदूची सुटका होईल की, नाही, असा प्रश्न उभा राहिला होता. या घटनेच्या धक्क्याने चंदूची आजी लीलाबाई (६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्याचवेळी चंदूच्या कुटुंबीयांनी ताे परत येईपर्यंत अस्थींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला हाेता. ताे परतल्यावरच त्याच्याच हाताने अस्थींचे विसर्जन करण्याचे ठरवले हाेते. अखेर त्याच्या सुटकेनंतर लागलीच रविवारी (दि. १२) त्याने आजीच्या अस्थींचे गोदापात्रामधील रामकुंडात विसर्जन केले. 

धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील मूळ रहिवासी असलेला चंदू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये कार्यरत असताना काही महिन्यांपूर्वी अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने तेथील लष्कराने त्याला कैद करून ठेवले होते. भारतीय लष्कराने चंदूला मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यानंतर त्याची महिन्याभरापूर्वीच सुटका झाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तो मूळ गावी आला. अस्थिविसर्जन करताना चंदू यांना अश्रू अनावर झाले. 
 
“भारत माता की जय’ चा जयघोष  
या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना तो म्हणाला, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकर, सुभाष भामरे यांच्यासह देशातील प्रत्येकाने मला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच मी मायदेशी परत येऊ शकलाे. “भारत माता की जय’चा जयघाेषही त्याने केला. दरम्यान, चंदूची बहीण मंगल पाटील यांनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न केलेल्या भारत सरकार व संरक्षण खात्याचे आभार मानले.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...
बातम्या आणखी आहेत...