आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्राेचे मिशन शुक्र लवकरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्राे) लवकरच शुक्राच्या अभ्यासासाठी मोहीम राबवणार आहे. मंगळयानाप्रमाणे चांद्रयान-२ सोबतच मिशन शुक्रचा प्रयत्न असल्याचे इस्राेच्या सूत्रांनी सांगितले. त्या दिशेने कामाला सुरुवात झाली आहे. शुक्र हा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे. तेथे विषारी वायूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्र पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला फिरतो. त्यामुळे तेथील वातावरणाचा आणि त्याच्या भोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्राेतर्फे हे मिशन हाती घेण्यात आले आहे. या मिशनमधून शुक्रावरील अनेक रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न असेल. तसेच या मिशनद्वारे इस्राे आणि खगोलशास्त्रज्ञांना संशोधन करायला भरपूर वाव आहे. शुक्रासंदर्भात आतापर्यंत अनेक मिशन फसले आहेत. फक्त यापूर्वी शुक्राच्या पुढील मिशन अॅस्टेरॉइड मिशन नासाने डॉन आणि युरोपियन स्पेस एजन्सीने रोसेट्ट राबवले होते. त्याचबरोबर शुक्राला कडे नसल्याचेही यापूर्वी सिद्ध झाले आहे. मात्र, कमालीची उष्णता आणि सूर्याच्या जवळ असल्याने तेथे संशोधनास प्रचंड वाव आहे. शुक्रासंदर्भातील अनेक रहस्ये याद्वारे उलगडण्याचा इस्राेचा प्रयत्न असेल.

अंतराळसंशोधनात पूर्णपणे स्वावलंबी होणार...
इस्राेने गुरुवारी (दि. १६) पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही-एमके-३ या रॉकेट इंजिनच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. अतिशय कठीण अशा चाचण्यांना एमके-३ ला सामोरे जावे लागले. त्यानंतर हे राॅकेट इंजिन योग्य असल्याचे इस्राेच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले. या चाचण्या इस्राे येथे पार पडल्या, त्या वेळी संचालक डी. कार्तिकेसन, महेंद्रगिरी आणि यांचे सहकारी तेथे उपस्थित होते. कार्तिकेसन यांनी सर्व चाचण्या योग्यरीत्या पार पाडल्या आणि एमके-३ ने सर्व चाचण्या पास केल्याचे म्हटले आहे. सुरक्षा मानांकनाच्या दृष्टीनेही ते पात्र ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...