आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रेस अक्राॅस अमेरिका’ पूर्ण करणारे पहिले भारतीय नाशिकचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘रेस अक्राॅस अमेरिका’ अर्थात ‘रॅम’ ही जगातील अत्यंत अवघड मानली जाणारी सायकल शर्यत नाशिकच्या डाॅ. हितेंद्र अाणि डाॅ. महेंद्र महाजन या सायकलपटूंनी निर्धारित नवव्या दिवशी तब्बल नऊ तास बाकी असतानाच पूर्ण करतानाच नवा विक्रम प्रस्थापित केला अाहे. २० जूनपासून प्रारंभ झालेल्या या शर्यतीत २९ जूनपर्यंतच्या नऊ दिवसांत ४८०० किलाेमीटरचा अत्यंत खडतर वाटेवरचा हा नाॅनस्टाॅप सायकलप्रवास त्यांनी ८ दिवस अाणि १५ तासांत पूर्ण केला. ही रेस पूर्ण करणारे ते पहिले भारतीय सायकलपटू ठरले अाहेत.

अमेरिकेच्या पश्चिम टाेकापासून पूर्व टाेकापर्यंतचा हा ४८०० किलाेमीटरचा सायकलप्रवास पूर्ण करण्यास महाजन बंधूंना ८ दिवस पूर्ण अाणि नवव्या दिवसाचे १५ तास इतकाच कालावधी लागला.

दाेन भारतीयांनी केला हाेता प्रयास
ही शर्यत अत्यंत अवघड मानली जाते. अद्यापपर्यंत एकाही भारतीयाला ती पूर्ण करण्यात यश अालेले नव्हते. रेसला प्रारंभ झाल्यापासूनच्या गत ३४ वर्षांच्या काळात बंगळुरुचा सलिम रिझवी व अलिबागचा समित पटेल यांनी वेगवेगळ्या वर्षी साेलाे गटात स्पर्धेत भाग घेतला हाेते. मात्र, त्यांनादेखील ही स्पर्धा पूर्ण करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने डाॅ. महाजन बंधूंनी मिळवलेले यश सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरले अाहे. अाॅस्ट्रियाच्या सेव्हेरिन जाॅटरने साेलाे गटातील िवजेतेपद मिळविताना ८ दिवस, ८ तास, १७ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.
कल्पतरू फाउंडेशनसह ‘दिव्य मराठी’चेही याेगदान
‘रॅम’ शर्यतीसाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी उभारावा लागला हाेता. त्यात नाशिकमधील डाॅ. शरद पाटील यांच्या ‘कल्पतरू फाउंडेशन’सह अनेक सामाजिक संस्थांनी तसेच वैद्यकीय पेशातील अनेक मान्यवर, सायकलप्रेमींनी अाणि अन्य व्यावसायिकांनीदेखील याेगदान दिले हाेते. ‘दिव्य मराठी’च्या वतीनेदेखील सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराच्या अायाेजनासह ६१ हजार रुपयांचा धनादेश डाॅ. महाजन बंधूंना प्रदान करण्यात अाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...