आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's Talent Live Audition Today In Nashik City

इंडियाज‌् टॅलेंट लाइव्ह अाॅडिशन अाज नाशकात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हाेतकरू अाणि बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव मिळावा, यासाठी ‘दैनिक भास्कर समूह’ अाणि क्लब पिंबल यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘इंडियाज् टॅलेंट’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले अाहे. त्यानुसार लाइव्ह अाॅडिशन अाज (दि. २१ नाेव्हेंबर) नाशकात हाेणार अाहेत. त्र्यंबकराेडवर पाेलिस अकॅडमीसमाेर असलेल्या फ्रावशी अकॅडमीमध्ये सकाळी वाजेपासून या अाॅडिशन्स सुरू हाेतील. त्यात सहभागी हाेण्यासाठी अायाेजनस्थळीच सकाळी ते दुपारी या वेळेत नाेंदणी करावी लागेल. ती पूर्णत: नि:शुल्क असेल.

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी हाेऊन कला, काैशल्य, प्रतिभा याचे सादरीकरण करता येईल. प्रत्येकाला त्यासाठी तीन मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. गायन, नृत्य, अभिनय, हास्यकला, वाद्यकला, कलाकाैशल्य अाणि वृत्तनिवेदन यापैकी काेणताही प्रकार त्यांना सादर करता येईल. एकाच कुटुंबातील अनेक मुलेही त्यात सहभागी हाेऊ शकतील.

विजेत्यांना इंडियाज् टॅलेंट पुरस्काराने गाैरविण्यात येईल. तसेच त्यांचे व्हिडिअाे अायाेजकांमार्फत यू ट्यूबवर अपलाेड करण्यात येतील. अधिक माहितीसाठी कलीम खान यांच्याशी ७७६७८३४२२२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

नाेंदणीसाठी हे अावश्यक...
‘इंडियाज्टॅलेंट लाइव्ह अाॅडिशन’मध्ये सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना साेबत अापले फाेटाे, अाेळखपत्र किंवा शाळेचे अाेळखपत्र साेबत अाणणे अनिवार्य अाहे. नृत्य, अभिनय, हास्य, गायन, वादन यासाठी अावश्यक पेहराव, मेक-अपचे साहित्य, वाद्यदेखील त्यांनी स्वत:च अाणावयाची अाहेत.