आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णयप्रक्रियेमध्ये सहभागासाठी साेशल मीडियाचा व्हावा स्मार्ट वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटी बनविताना सर्वसामान्यांनी निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरीही प्रत्यक्षात निर्णयांची याेजनांची माहितीच सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचत नसल्याने ते या प्रक्रियेपासून दूर राहतात. त्यांच्या सहभागासाठी साेशल मीडियाचा स्मार्ट वापर व्हावा, असा सूर स्मार्ट सिटी अायडिएशन कॅम्पमध्ये व्यक्त झाला. त्यामुळे योग्य माहिती सामान्यांपर्यंत पाेहोचेल, असा सल्लाही विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांनी दिला.

एमअायटी कुंभथाॅन नाशिक महापालिका अायाेजित अायडिएशन कॅम्पमध्ये सोमवारी सुमारे २५०हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदविला. कॅम्पच्या उद्घाटनावेळी महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम म्हणाले की, शहराच्या सक्षमीकरणासाठी तरुणांची बाैद्धिक ताकद गरजेची अाहे. ही ताकद शहराला अधिक स्मार्ट बनविण्यास उपयुक्त ठरणार अाहे. स्मार्ट नाशिक अॅप अाणि संकेतस्थळाने नाशिककरांच्या समस्या तातडीने सुटण्यास मदत हाेणार अाहे. निर्णयप्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश असावा यासाठी अाम्ही प्रयत्नशील अाहाेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहर अभियंता सुनील खुने, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, जी. एम. पगारे, एस. अार. वंजारी, डाॅ. नितीन रावते, क्रिसिलचे तनिष यादव, विशाल कचाडिया, गायत्री अाेक, रिनी सॅम्युअल, सिटी सेंटर माॅलचे सीईअाे अभय अापटे, कुंभथाॅनचे सचिन पाचाेरकर, महेश गुजराथी, संदीप शिंदे, गिरीश पगारे अादी उपस्थित हाेते.

छागयी’ सॅन फ्रान्सिस्काेतील माेदी भेट : सॅनफ्रान्सिस्को येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी फेसबुक गुगलच्या कार्यालयाला दिलेली भेट साेमवारी कुंभथाॅनमध्येही चर्चेचा विषय ठरली. याबाबत अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहायक प्राध्यापक मूळचे नाशिककर डाॅ. रमेश रासकर यांनी विद्यार्थ्यांशी ‘लाइव्ह’ संवाद साधून चर्चा केली.

पाणीपुरवठा खर्च डाेईजड
^पाणी व्यवस्थापनासाठी अाम्ही प्राेजेक्ट केला अाहे. पाच हजार रुपये प्रतिहजार लिटर असा खर्च महापालिकेला पाणीपुरवठ्यातून हाेताे. हा खर्च वसूल करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सर्वत्र सारख्याच दाबाने पाणीपुरवठा व्हायला हवा. राहुल लवटे, विद्यार्थी

एकच वेळ द्या पुरेसे पाणी
^दाेन वेळएेवजी एकच वेळ, परंतु पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, ही अामची प्रमुख सूचना अाहे. त्याचप्रमाणे शहर परिसरातील झाेपडपट्टी भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय टाळण्यासाठीही ठोस प्रयत्न करण्याची गरज अाहे. गीतांजलीशिंदे-राठाेड, इनोव्हेशन इंजिनिअर, मुंबई

टॅलेंटला मिळाले व्यासपीठ
^नाशिकचा कुंभमेळा ज्याप्रमाणे तंत्रज्ञानामुळे अधिक सुकर झाला. त्याच प्रमाणे स्मार्ट सिटीचे उद्दिष्टही साध्य व्हावे, या विचाराने चर्चासत्राचे अायाेजन करण्यात अाले हाेते. नाशिकमधील तरुणांच्या टॅलेंटला यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले. सचिन पाचाेरकर, समन्वयक, एमअायटी कुंभथाॅन

दृष्टिक्षेपात...
२५०विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
३५ तज्ज्ञ तंत्रज्ञांचे मार्गदर्शन
११ क्षेत्रांचा झाला विशेष अभ्यास
०७ टीमचा संपूर्ण कॅम्पमध्ये सहभाग

वीजमीटरमधून बिल दिसावे
^ऊर्जा संवर्धनासाठी जागृतीचा अभाव अाहे. इलेक्ट्राॅनिक मीटरमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज अाहे. त्यात युनिट दर्शविण्यापेक्षा किती पैशांची वीज वापरली याची माहिती ग्राहकांना मिळाल्यास वीजबचतीकडे ते लक्ष केंद्रित करतील. कमलेश कांकरिया

झाेपडपट्टी पुनर्विकास व्हावा
^स्मार्ट सिटीसाठी शहरातील झाेपडपट्टी पुनर्विकासाची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. त्यासाठी मूलभूत साेयी-सुविधांची मुबलक उपलब्धता असावी. तसेच झाेपडपट्टीच्या जागेवरच घरकुल याेजना राबविण्यात याव्यात. शिल्पा धामणे

अाराेग्य याेजना पाेहोचाव्यात
^अाराेग्याशी संबंधित सरकारी याेजना लाेकांपर्यंत पाेहोचाव्यात. रक्त रक्तातील घटकांची पुरेशी उपलब्धता असावी. शहर परिसरातील माेकाट श्वानांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना केली जावी. डाॅ.अभय जाेशी, तज्ज्ञ अाराेग्य विभाग

हरित पट्टे मुबलक असावेत
^रस्त्यावरील व्यवस्थापन सुयाेग्य असावे, तसेच हरित पट्टेही मुबलक प्रमाणात असावेत. साेशल मीडियाद्वारे अधिकाधिक प्रभावीपणे जनजागृती करता येईल. रश्मी हसवाणी

रस्त्यांवरील अतिक्रमणे काढावीत
^सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा हाेणे गरजेचे अाहे. बसमधील गर्दी कमी झाल्यास नागरिकांना प्रवास करणे याेग्य वाटेल. रस्त्यावरील अतिक्रमणेही काढण्यात यावीत. - साईश्री सत्या, विद्यार्थी