आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकींसाठी इंदिरानगर येथील बोगदा एकेरी, प्रशासनाचा वाहतूक कोंडी सुटण्यासाठी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर बोगदा येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गोविंदनगर भागाकडून येणारी चारचाकी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. याबाबत वाहनचालक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशासनाने नागरिकांचे मत लक्षात घेता इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद केला होता. त्यामुळे अनेक आंदोलने नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. त्यानंतर तब्बल महिन्यांनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी मध्यस्थी करून हा बोगदा मोकळा केला. त्यामुळे नागरिक वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, सायंकाळी वाढती वाहतूक लक्षात घेता चारचाकी वाहनांसाठी पुन्हा एकदा गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे येणारी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. दुचाकींसाठी मात्र दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोंडीत अडकून वेळ वाया जात होता, ती समस्या कमी होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

या बोगद्याच्या दोन्ही बाजूंना इंदिरानगर गोविंदनगर रस्त्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यामुळे सर्व्हिस रोडवरील दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडीचा अपघाताचा प्रश्न सुटणार आहे. यापूर्वी येथे सिग्नल लवकरात लवकर सुरू केले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विषय लांबला आहे. या ठिकाणी वाहतुकीचा प्रचंड दबाव येत असून, त्यासाठी सिग्नल हा पर्याय आहे.

नागरिकांच्या हिताचा निर्णय व्हावा
^प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा. वाहतूक वाढत आहे. चारचाकींसाठी एकेरी दुचाकीसाठी दुहेरी वाहतूक निर्णय योग्य आहे. -अॅड. भानुदास शौचे, नागरिक

सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करा
^या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करणे गरजेचेे आहे. वाहतूक पोलिसांना या ठिकाणी कोंडी दूर करण्यात अनेक अडचणी येतात. -गणेश जाधव, शिवसेना पदाधिकारी
बातम्या आणखी आहेत...