आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बोगदाप्रश्नी वाहनचालकांचेच अर्ज, स्थानिक नागरिकांचे अर्ज घेतले जात नसल्याने संताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इंदिरानगर बोगदाप्रश्नी पोलिसांकडून फक्त वाहनचालकांचेच अर्ज भरून घेतले जात असून, स्थानिकांची मते जाणून घेता मनमानी केली जात असल्याचा आरोप स्थानिक रहविाशांनी केला आहे. शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध करत या बोगद्याप्रश्नी हरकती मागवण्यात आल्याने स्थानिकांच्या भावनांचा एक प्रकारे अनादरच केल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

इंदिरानगर बोगदा एकेरी वाहतुकीस सुरू करण्याचे आश्वासन आमदार देवयानी फरांदे, महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्थानिक नगरसेवकांना पोलिस आयुक्तांनी दिले होते. स्थानिक नागरिकांनी याप्रश्नी बोगद्याजवळ आंदोलन सुरू केले होते. महापौरांनी आंदोलकांना एकेरी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली. यास दहा दविसांचा कालावधी उलटूनही हा बोगदा पादचाऱ्यांसाठीही बंद करण्यात आला. या सर्व घडमोडीत पोलिस आयुक्तांना टीकेचा धनी व्हावे लागत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सहा दविसांपासून वाहन चालकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. सुमारे सहाशे अर्ज भरून घेण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त प्रशांत वायगुंडे यांनी सांगितले.

वाहनचालकांसह नागरिकांमध्ये विरोधाभास
स्थानिकनागरिक बोगदा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे, तर काही वाहनचालकांनी बोगदा बंद झाल्याने कोंडीचा प्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.