आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indiranagar Issue Locomotion Of Police 12 Days After

इंदिरानगर बाेगदाप्रश्नी पाेलिसांचे १२ दिवसांनंतर हरकतींचे अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इंदिरानगरबाेगदा बंद करण्याच्या एकतर्फी निर्णयाविराेधात रहिवासी, लाेकप्रतिनिधींचा विराेध न्यायालयात अाव्हान देण्याची तयारी सुरू असतानाच, विलंबाने का हाेईना पाेलिस अायुक्तांनी रहिवाशांच्या लेखी हरकती, सूचना मागविल्या अाहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी महापाैर, उपमहापाैर स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पाेलिस अायुक्तांची भेट घेतली असता, त्यांनी तातडीने लेखानगर ते मुंबई नाका मुंबई नाका ते लेखानगर समांतर मार्गावरील एकेरी केलेली वाहतूक दुतर्फा करण्याचे अादेश दिले हाेते. मात्र, शुक्रवारी पुन्हा प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत त्याचा समावेश करता अाधीची अधिसूचना कायम ठेवली असून, त्यात हा मार्ग एकेरीच ठेवल्याने पोलिस अायुक्तांनी घूमजाव केल्याचे बाेलले जात अाहे.

गोविंदनगर, तिडके काॅलनी या भागातून इंदिरानगर, नाशिकराेडकडे जाणाऱ्या त्याच दिशेने परतणाऱ्या वाहनधारकांसाठी हा बाेगदा वाहतुकीस बंद केला अाहे. यासाठी १२ जुलै राेजी उपअायुक्त पंकज डहाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, गाेविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणारी वाहने या बाेगद्याच्या पुढे मुंबई नाक्याच्या अलीकडे पीलर क्रमांक १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरानगर, पाथर्डी फाट्याकडे जातील. तर, इंदिरानगरकडून येणारी वाहतूक लेखानगर चाैकाच्या बाेगद्यातून यू टर्न घेऊन पुढे जातील.

पादचाऱ्यांसाठीही बंदच
बाेगदाकेवळ पादचाऱ्यांसाठीच खुला राहणार असल्याचे दाेन्ही अधिसूचनेत प्रसिद्धीस िदले असले तरी प्रत्यक्षात माेठे दगड बाेगद्यात ठेवण्यात अाल्याने पादचाऱ्यांनाही त्याचा उपयाेग हाेत नाही. त्यामुळे पाेलिसांकडून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचीही दिशाभूल केलीच जात अाहे.

बोगदा बंदनंतर आमदार, महापौर लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने त्यांनी अायुक्तांची भेट घेत निषेध नाेंदिवला. रहिवासी, वाहनचालकांचे मत विचारात घेता हा निर्णय घेतल्याने संताप व्यक्त केला गेला. यावर रहिवाशांचे मत घेण्याची गरज नसल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात हाेते. अखेरीस उपअायुक्तांनी बंद बोगद्याबाबत सात दिवसांत लेखी हरकती सूचना शहर वाहतूक शाखा कार्यालय (जुने पोलिस आयुक्तालय) शरणपूरराेड येथे अथवा दूरध्वनीद्वारे सूचनांसाठी ०२५३-२३०५२२८)येथेसंपर्क साधण्याचे अावाहन केले आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत
प्रसिद्धकेलेल्या अधिसूचनेत मुंबई नाका ते लेखानगर लेखानगर ते मुंबई नाका या समांतर मार्गावरील वाहतूक एकेरी करण्याचा उल्लेख अाहे. वास्तवात, दाेनच दिवसांपासून या मार्गावर दुहेरी वाहतुकीस परवानगी दिली हाेती. त्यामुळे नव्या अधिसूचनेत तसा उल्लेख करण्याएेवजी पहिलीच सूचना कायम ठेवल्यानेे अनेक प्रश्न उभे ठाकले अाहेत. जर इंदिरानगरकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या वाहनधारकाचा अपघात झाला त्याने माेटार अपघात न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा केला तर याच अधिसूचनेचा फटका बसू शकताे. त्यातून हा दावा फेटाळला जाण्याची शक्यता अधिक असल्याचेही विधिज्ञांचे म्हणणे अाहे.

लाेकप्रतिनिधींची दिशाभूल
बोगद्यातूनपादचारी मार्ग दोन्ही समांतर रस्त्यांहून एकेरी वाहतूक बंद करून दुहेरी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे पाेलिस अायुक्तांनी महापाैर, उपमहापाैर नगरसेवकांना अाश्वासन िदले हाेते. त्याची दाेन