आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांचा संयम सुटला, इंदिरानगर बोगदा पुन्हा खुला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- इंदिरानगर बोगदा सुरू करण्याच्या मागणीकडे प्रशासनाकडून अनेक कारणे दाखवत चालढकल केली जात असल्याने, संयम सुटलेल्या वाहनचालकांनी या बाेगद्यावरील सिमेंटचे ब्लाॅक हटवत रविवारी रात्री हा बाेगदा सुरू केला. सायंकाळी पाउस सुरू असतानाही नागरिकांनी हा रस्ता खुला केला. रस्ता खुला झाल्याने बहुतेक दुचाकीचालकांनी बोगद्यातून जाणे पसंत केले. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करत यापुढे हाच तोडगा काढला जाईल असे स्पष्ट केले.
अंतपाहू नका : हाबोगदा लवकरच सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधींकडून याबाबत याचिका दाखल करावयाची प्रक्रिया सुरू झाली असून, आता प्रशासनाने अंत पाहता रस्ता सुरू करावा, अशी मागणी हाेत आहे.

कायमचा तोडगा काढा
बोगदा निर्मिती करताना चुका झाल्या आहेत. त्याची दुरुस्ती हाेण्यासारखी नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, मात्र तोपर्यंत रस्ता सुरू करावा. नागरिकांची गैरसोय टाळावी. -अॅड.भानुदास शौचे, विभाग अध्यक्ष, ब्राह्मण संस्था

इंदिरानगर बाेगदा बंद प्रकरणी वाहनधारक, रहिवाशांच्या हरकती, सूचना लेखी अथवा फाेनद्वारे शहर वाहतूक विभागाच्या सहायक पाेलिस अायुक्तांकडे सादर करण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे. जुन्या पाेलिस अायुक्तालयाच्या इमारतीतील वाहतूक शाखेच्या कार्यालयात या हरकती स्वीकारण्यात येत अाहेत. दरम्यान, इंदिरानगरसह परिसरातील ज्या रहिवाशांना, महिला, विद्यार्थ्यांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाणे शक्य हाेणार नसेल, त्यांनी सहायक पाेलिस अायुक्त, शहर वाहतूक विभाग यांच्या नावे सूचना, हरकतींचा लेखी अर्ज संपर्क कार्यालयात जमा केल्यास ताे त्यांच्यापर्यंत पाेहोचविण्याची व्यवस्था स्थानिक दाेघा नगरसवेकांनी उपलब्ध करून दिली अाहे. यामध्ये नगरसेविका दीपाली सचिन कुलकर्णी यांच्या रथचक्र चाैकात सकाळी १० ते रात्री ८.३०, तर नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या साईनाथनगर संपर्क कार्यालयात सकाळी ११ ते सायं. पर्यंत लेखी स्वरूपात अर्ज स्वीकारण्याची साेय उपलब्ध करून देण्यात अाली अाहे.
वाहनचालकांनी रविवारी रात्री इंदिरानगर बाेगदा सिमेंटचे ब्लाॅक हटवत खुला केला.