आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगरचा बोगदा वाहतुकीसाठी बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गाेविंदनगर,तिडके काॅलनी, सिडकाे या भागातून इंदिरानगर, नाशिकराेडकडे जाणाऱ्या त्याच दिशेने परतणाऱ्या वाहनधारकांसाठी उड्डाणपुलाखाली काढण्यात अालेल्या बाेगद्यात वाहतूक काेंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र हाेत असतानाच, अाता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार हा बाेगदाच वाहतुकीसाठी बंद करण्यात अाला अाहे. याएेवजी वाहनधारकांना अाता एक ते दीड किलाेमीटरचा फेरा मारावा लागणार असून, मुंबई नाका ते लेखानगर लेखानगर ते मुंबई नाका या सर्व्हिसराेडवर एकेरीच वाहतुकीला परवानगी देण्यात अाली अाहे.

पाेलिस उपअायुक्त पंकज डहाणे यांनी रविवारी वाहतूक अधिसूचना प्रसिद्ध केली असून, लागलीच या वाहतुकीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे म्हटले अाहे.

गरवारे पाॅइंट ते द्वारका या मार्गावर टाकण्यात अालेल्या उड्डाणपुलाच्या खाली इंदिरानगर येथे दाेन्ही बाजूच्या रहिवासी भागातील वाहनधारकांना वाहतुकीसाठी बाेगदा खाेदण्यात अाला अाहे. मात्र, या बाेगद्याखालून मुख्य रस्त्यावरून खाली उतरणारे वाहने, समांतर रस्ते असे एकूण अाठ मार्गांवरून वाहने एकत्रित येत असल्याने या बाेगद्यात दरराेज वाहतूक काेंडी हाेते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनधारकांसह परिसरातील रहिवासी, व्यावसायिक त्रस्त झाले अाहेत. या बाेगद्यामुळे अातापर्यंत किमान १०हून अधिक निष्पाप वाहनधारकांचा बळी गेला अाहे. या काेंडीतून उपाययाेजना काढण्यासाठी वारंवार अांदाेलने हाेऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यातच अामदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गेल्याच महिन्यात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यावर उपाययाेजनांचे अादेश िदले हाेते. दरम्यान, प्राधिकरणाच्या एका पथकाने या ठिकाणी अाठवडाभर सर्वेक्षण करून शहर वाहतूक शाखेला अहवाल सादर केला. त्यानुसार हा बाेगदाच वाहतुकीसाठी सक्षम नसून ताे पूर्णपणे बंद करण्याची सूचना केली. तसेच, मुंबई नाका ते लेखानगर लेखानगर ते मुंबई नाकापर्यंतचा दुतर्फा रस्ता पूर्णपणे एकेरी वाहतूक करण्याची सूचना केली. यावर पर्याय म्हणून गाेविंदनगरकडून इंदिरानगरच्या दिशेने जाणारी वाहने या बाेगद्याच्या पुढे मुंबई नाक्याच्या अलीकडे उड्डाणपुलाखालील पीलर क्रमांक १७१ जवळून उजवीकडे वळून इंदिरानगर, पाथर्डी फाट्याकडे जातील. तर इंदिरानगर, मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक बाेगद्यातून गाेविंदनगर, तिकडे काॅलनीकडे जाणारी वाहतूक बाेगद्याएेवजी सरळ जाऊन लेखानगर चाैकाच्या बाेगद्यातून युटर्न घेऊन पुढे गाेविंदनगर, तिडके काॅलनीच्या दिशेने जातील.

बाेगदाकेवळ पादचाऱ्यांसाठी उड्डाणपुलाखालील बाेगदा हा तांत्रिकदृष्टया अयाेग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात असले तरी त्यावेळी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. दरम्यान, बाेगदा केवळ पादचाऱ्यांसाठीच खुला राहणार अाहे.

वाहनधारकांना विश्वासात घेताच नियाेजन
महामार्गप्राधिकरणाच्या सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेने अधिसूचना प्रसिद्ध केली असली तरी प्रत्यक्षात या भागातून जाणारे वाहनधारक परिसरातील रहिवाशांची मते विचारात घेतली नाहीत. त्यामुळे वाहनधारक पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता अाहे. दाेन्ही बाजूच्या वाहनधारकांना दाेन किलाेमीटरचा फेरा पडणार असून, राेगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण झाली अाहे.