आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बोगदा सुरू करण्याची प्रतीक्षा; उद्या न्यायालयात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर बोगदा सुरू करण्यासाठी मनसे, शिवसेना आप या पक्षांनी आंदोलन करूनही अद्याप अपेक्षित निर्णय होत नसल्याने नागरिकांनी आता थेट न्यायालयात जाण्याचे ठरविले आहे. दरम्यान, या संदर्भातील सर्व्हेक्षण अर्ज भरण्यासही वाहनचालकांनी चांगला प्रतिसाद दिला. यासंदर्भात सोमवारी (दि. २०)जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

आठवड्याभरापासून या ठिकाणी मनसे, शिवसेना, आप यांच्यासह सर्वसामान्य नागरिक रस्ता सुरू करावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. अर्ज, विनंत्या आंदोलन या सर्व मार्गातून प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा सर्वांना आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. यापुढे न्यायालयात जाण्याचाही निर्णय शिवसेना मध्य नाशिक विधानसभा प्रमुख संजय गायकर यांनी घेतला आहे. सोमवारी ते याचिका दाखल करणार आहेत.

वाहतूक पोलिसांकडे दुहेरी जबाबदारी
हारस्ता सुरू करावा की, नाही, यासाठी सर्व्हे सुरू असून, नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. हे फॉर्म भरून देण्याची घेण्याची जबाबदारी येथील वाहतूक पोलिसांकडे दिली आहे. मात्र, वाहतूक नियंत्रित करायची की, फॉर्म भरायचे असे कारण दाखवत पोलिस यात विशेष रस दाखल नसल्याचे चित्र आहे. काही पोलिस बोगदा बंद राहावा, असे लिहा सांगत असल्याचे समोर आले. त्यामुळे या सर्व्हेक्षणाचा नेमका निष्कर्ष काय निघेल याबद्दलही शंका व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...