आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योजकांचीही होणार ‘एम्प्लॉयमेंट’मध्ये नोंदणी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उद्योजकांना पात्रतेप्रमाणे उमेदवार मिळविण्यासाठी आता एम्प्लॉयमेंटच्या नव्या बेवसाइटवर नावनोंदणी करावी लागणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतीमध्येही बेरोजगारांची नावनोंदणी होणार असल्याने उद्योजकांना मनासारख्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यास मदत होईल. ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांची माहिती रोजगार व स्वयंरोजगार विभागाला समजणार असल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.

या विभागामार्फत बेरोजगारांची नावे नोंदण्यासाठी आता ग्राम संग्राम (ग्राम संगणकीय ग्रामपंचायत माहिती) ही योजना संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये केवळ बेरोजगारच नाही तर उद्योजकांची नावे नोंदविण्यात येणार असल्याने जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे उद्योजक व बेराजगार युवक या दोघांनाही लाभ होणार आहे. बेरोजगारांनी नावनोंदणीच्या वेळी मोबाइल नंबर दिला असल्यास त्यांना एसएमएस सेवाही मिळणार आहे.

दहावी व बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जिल्हास्तरावरील रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात रोजगारासाठी नावनोंदणी करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या विभागाने नवीन वेबसाइट सुरू केली असून, तिची नोंदणी सेंट्रल सर्व्हरवर होणार आहे. ग्रामपंचायतीत सुरू होणार्‍या ग्राम संग्राम केंद्रात नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात बैठका सुरू आहे. ग्रामविकास मंत्रालयामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणकीयकृत दाखले देण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हय़ात ज्या गावाची लोकसंख्या हजाराहून अधिक असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये हे ग्राम संग्राम केंद्र स्थापन होणार आहे. आतापर्यंत 608 ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. या वेबसाईटवर प्रायोगिक तत्त्वावर नावनोंदणी सुरू आहे. ही वेबसाइट पूर्णपणे कार्यान्वित होण्यास महिना लागू शकतो.