आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झूम’ बैठकीअभावी अाैद्याेगिक वसाहतीला पायाभूत सुविधांचे ग्रहण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर असाे की अंबड, दाेन्ही अाैद्याेगिक वसाहतींना पायाभूत सुविधांचे ग्रहण लागले अाले. विशेष म्हणजे, उद्याेगांचे प्रश्न साेडविण्यासाठी ‘जिल्हा उद्याेग मित्र’च्या (झूम) नियमित बैठका हाेणे अपेक्षित असतानाही त्या हाेत नाहीत. गेल्या दिवाळीत, म्हणजे बराेबर एक वर्षापूर्वी ‘झूम’ची बैठक झाली हाेती, त्यानंतर अशी बैठकच झालेली नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांसारख्या समस्या अा वासून उभ्या ठाकल्याने उद्याेजकांत संताप पहायला िमळत अाहे. अाैद्याेगिक वसाहतींकरिता म्हणून स्वतंत्र नगरसेवकाची तरतूद महापालिकेत नसल्याने ही स्थिती निर्माण हाेत असल्याचाही सूर व्यक्त हाेत अाहे.
एका बाजूला राज्य सरकार ‘मेक इन महाराष्ट्र’चा, तर अाता नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनकडून ‘मेक इन नाशिक’चा नारा दिला जात अाहे. परदेशी दूतावासातील अधिकारीही येथे येऊन पाहणी करू लागले अाहेत, मात्र दाेन्ही अाैद्याेगिक वसाहतींतील पथदीप, ड्रेनेज, साईडपट्ट्यांचा मेंटेनन्स यांसारखे साधेसाधे प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. सातपूर अाैद्याेगिक वसाहतीत तर दहापैकी एकच पथदीप सुरू असल्याने कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे.

पाेलिस अायुक्तांसाेबत झालेल्या बैठकांतही उद्याेजकांनी पथदीपांअभावी अंधाराचे साम्राज्य अनेक भागात असल्याने वेतन, बाेनस घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत अाला अाहे. ५० हजारांवर कामगार काम करीत असतानाही एमअायडीसीतील रस्त्यावर साधी स्वच्छतागृहेदेखील उभारण्यात अालेली नाहीत. काेणतीही कामगार संघटना किंवा उद्याेजकांच्या संघटनेने या मुद्द्यावर केवळ मागणी करण्याशिवाय प्रशासनाला जाब विचारल्याचे एेकिवात नाही.

स्वतंत्र अाैद्याेगिक वसाहतीची गरज
^साध्या मूलभूत सुविधाही मिळत नसतील तर महापालिकेपासून एमअायडीसी स्वतंत्र करून स्वयंपूर्ण अाैद्याेगिक वसाहत हाेणे गरजेचे अाहे. एक वर्षापासून साधी ‘झूम’ची बैठकही प्रशासन घेऊ शकलेले नाही. -राजेंद्र छाजेड, माजी अध्यक्ष, लघुउद्याेग भारती
बातम्या आणखी आहेत...