आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त बैठकीला अजून लागेना मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांप्रश्नी होऊ घातलेल्या संयुक्त बैठकीला आठवडा उलटला तरी मुहूर्त लागलेला नाही.

औद्योगिक वसाहतीला भेडसावणारे रस्ते, पथदीप, स्वच्छता यांसारख्या समस्या सुटाव्यात आणि चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमआयडीसी, उद्योजक आणि पालिका पदाधिकारी, प्रशासनाची संयुक्त बैठक आठवडाभरात बोलाण्याचा स्वागतार्ह निर्णय जिल्हाधिकारी वलिास पाटील यांनी जाहीर केला होता. मात्र, हा निर्णय जाहीर करून आठवडा उलटला तरी पालिकेसमवेतच्या या संयुक्त बैठकीला मुहूर्त लागलेला नाही.

या दोन्ही औद्योगिक वसाहतींतून पालिकेला ६० टक्क्यांवर एलबीटी आणि घरपट्टीसारखे अनेक कर मोठ्या प्रमाणावर मिळतात. असे असतानाही, रस्ते, ड्रेनेज यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी अगदी तुटपुंजा निधी मिळतो. मागील वर्षी अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी पालिकेने मंजूर केला होता. त्यात, तीन रस्ते तयार करण्यात आले, पण सहा महिन्यांतच ते उखडले आहेत. दुसरीकडे, ड्रेनेजच नसल्याने अनेक कंपन्यांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसते आणि कच्च्या मालाचे नुकसान होते. विशेष म्हणजे अशी अवस्था असतानाही पालिका आणि एमआयडीसी सुविधा देण्याच्या मुद्यावर एकमेकांकडे बोट दाखतात, असा अनुभव उद्याेजकांना सातत्याने येत आहे.