आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात गुंतवणुकीसाठी जपानला साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये आैद्योगिक गुंतवणूक करावी, अशा आशयाचे साकडे उद्योजकांनी जपानचे भारतातील राजदूत योशिआकी आयटीआे यांना घातले. मुंबईत जपानच्या दूतावासाला नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन आणि अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संयुक्तपणे भेट दिली. या भेटीत नाशिकचे आैद्योगिक महत्त्व आणि नाशिकमधील आैद्योगिक संधी याबाबत पाच मिनिटांचे चित्रफितीद्वारे सादरीकरणही या शिष्टमंडळाने जपानी दूतावासाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसमाेर केले. दरम्यान, जपान सरकारला याबाबत माहिती दिली जाणार असून, आगामी काही प्रकल्पांसाठी जाणीवपूर्वक नाशिकचा पर्याय समाेर ठेवला जाईल, असे आश्वासनही योशिआकी आयटीआे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

जपान दूतावासाकडे पुणे, चाकण, सुपे यांसारखे पर्याय सध्या उपलब्ध असून, भविष्यात येणारी गुंतवणूक याच ठिकाणी होईल, अशी चर्चा असतानाच िनमा, आयमाच्या शिष्टमंडळाने जपानच्या दूतावासाला भेट दिली आणि नाशिकमधील आैद्योगिक गुंतवणुकीकरिताच्या संधी समाेर मांडल्या. नाशिकचे वातावरण आल्हाददायक असून, येथे स्वस्त दरात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे स्पष्ट करतानाच सिन्नरजवळील इंडिया बुल्सच्या सेझमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि कर सवलती यांबाबत माहिती दिली. नाशिक परिसरात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची माहिती देतानाच पाच मिनिटांचे सादरीकरणही करण्यात आले. दिंडाेरी परिसरात अन्नप्रक्रिया उद्योग असून, नाशिकमधून माेठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा मुंबईसह गुजरातमधील शहरांना दरराेज पुरवठा केला जाताे, याकडेही उद्योजकांनी लक्ष वेधले. जपानी दूतावासाच्या शिष्टमंडळाला नाशिक भेटीचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. आैद्योगिक संघटनांकडून अशा प्रकारची मागणी आणि सादरीकरण पाहून जपान सरकारला हे सादरीकरण दिले जाणार असून, भारतात जपानकडून येणाऱ्या आगामी काही प्रकल्पांकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे आश्वासन योशिआकी आयटीआे यांनी दिले.

जपानचे राजदूत योशिआकी आयटीआे यांना नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचे निवेदन देताना ‘निमा’चे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनीष काेठारी, ‘आयमा’चे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर गाेपाळे, हर्षद ब्राह्मणकर आदी.