आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial Peace New Era Of , To Disputes Settle Committee

औद्योगिक शांततेचे नवे पर्व, वाद मिटविण्यासाठी समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकात मोठे उद्योग येण्यात औद्योगिक शांततेचा अडसर येत असल्याची चिंता खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यानंतर नाशिकमधील उद्योजकांच्या संघटना आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेत एक संयुक्त समिती गठित करण्याची त्यातच कोणताही वाद प्राथमिक स्तरावर मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी केली. यामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात असून, राज्यातील इतर शहरांकरिता हा एक उत्तम आदर्श ठेवला आहे.
पुण्यात फाॅक्सकाॅन या चीनच्या कंपनीकडून मोठी गुंतवणूक होत असून, ही गुंतवणूक नाशिकमध्येही व्हावी याकरिता नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे एक शिष्टमंडळ स्थानिक आमदार आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यात मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये मोठे उद्योग गुंतवणूक करण्यास तेथील औद्योगिक अशांततेचा अडसर येत असल्याने हा प्रश्न चर्चेतून मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही दिला होता. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी निमा हाऊस येथे ही बैठक झाली, ज्यात कामगार उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली असता नाशिकमधील औद्योगिक अशांतता मिटवा, असा सल्ला त्यांनी उद्योजकांना दिला. याबाबत ‘दवि्य मराठी’त १२ आॅगस्ट रोजी प्रसदि्ध झालेले वृत्त.

स्वरूप राहील असे
आयमा,निमा या संघटनांकडून प्रत्येकी दोन प्रतिनिधी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती स्थापन होईल, ज्याच्या अध्यक्षस्थानी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव असतील. उद्योग किंवा कामगार संघटनांमधील कुठलेही वाद या समितीतच मिटविण्यावर भर दिला जाईल.

निर्णय यांच्या मंथनातून
नमिाचेअध्यक्ष संजीव नारंग, बाॅशच्या कार्मिक विभागाचे महाव्यवस्थापक मोहन पाटील, कामगार उपायुक्त आर. एस. जाधव, सीटूचे सरचिटणीस डाॅ. डी. एल. कराड, आयमाचे अध्यक्ष वविेक पाटील, कामगार विकास मंचचे अध्यक्ष कैलास मोरे, नमिाचे माजी अध्यक्ष रवी वर्मा, मनीष कोठारी, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी, व्हीनस वाणी, मनीष रावल, संदीप भदाणे, उत्तमराव खांडबहाले, ग्लेनमार्कचे किरण पाटील, डाॅ. उदय खरोटे यांनी या बैठकीत सहभाग नोंदवित हा आदर्श निर्णय जाहीर केला.

क्राॅम्प्टन प्रकरणीही लवकरच बैठक
अंबडऔद्योगिक वसाहतीतील क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीतील कामगारांचा संप मिटावा, याकरिता लवकरच या समितीची बैठक होईल. जेणेकरून एक चांगला संदेश राज्यापुढे जाऊ शकेल, अशी चर्चाही या बैठकीत झाली.

बैठकीत मार्गदर्शन करताना मध्यभागी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव. समवेत नमिाचे अध्यक्ष संजीव नारंग, सीटूचे सरचिटणीस डाॅ. डी. एल. कराड, मंगेश पाटणकर, बाॅशचे कार्मिक महाव्यवस्थापक मोहन पाटील. उजवीकडून नमिाचे माजी अध्यक्ष मनीष कोठारी, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे अध्यक्ष वविेक पाटील.

पुढची बैठक आता लोकप्रतिनिधींसमवेत...
याचबैठकीत आता पुढील बैठक आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन करण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडेही ह्या बैठकीनंतर संयुक्तपणे जात नाशिकमध्ये औद्योगिक शांततेचे एक नवे पर्व यानिमित्ताने सुरू झाल्याचा संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.