आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या घशात अाैद्याेगिक वापराचा अाॅक्सिजन, तरीहीप्रयाेगशाळेचा अहवाल ‘नाे अाेपिनियन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हाॅस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे अाॅक्सिजन सिलिंडर परवानाधारक पुरवठादार अथवा उत्पादकाकडूनच घ्यावा असा नियम अाहे. मात्र, काही हाॅस्पिटल मॅनेजमेंटकडून पैसे वाचविण्यासाठी परवानाधारक पुरवठादाराएेवजी अप्रमाणित अकुशल व्यक्तींच्या नियंत्रणाखाली तयार केलेल्या सिलिंडरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी अाहेत. यात हाॅस्पिटल प्रशासनासह सिलिंडर पुरविणारे अशा दाेघांचाही उद्देश फक्त पैसे कमविणे हाच असून, यासाठी चक्क रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न हाेत असल्याचाही अाराेप केला जात अाहे.
यांनाबजावली कारणे दाखवा नाेटीस
अाैद्याेगिक वापराचा सिलिंडर रुग्णांसाठी वापरणाऱ्या हाॅस्पिटल प्रशासनाला अन्न अाैषध प्रशासन विभागाच्या वतीने कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात अाली अाहे. यात सिन्नरमधील पाटील हाॅस्पिटल, यशवंत हाॅस्पिटल शिवाई हाॅस्पिटलचा समावेश अाहे. यापैकी दाेन हाॅस्पिटलने नाेटिसीला उत्तर दिल्याची माहिती अाैषध प्रशासन विभागाने दिली.

वर्षांनी तपासणी हाेणे अावश्यक
उत्पादकां कडून मिळणाऱ्या सिलिंडरची दर पाच वर्षांनी तपासणी हाेणे अावश्यक अाहे. एका सिलिंडरचे वजन ५४ ते ५५ किलाे असते. मात्र, त्याचे वजन कमी झाल्यास ते दर्जाहीन हाेत असल्याने तपासणी हाेणे गरजेचे अाहे. रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या सिलिंडरचे प्रेशर गेज लावून वजन करणे अावश्यक अाहे. अाॅक्सिजन सिलिंडर जेथ‌े उत्पादित केले जाते, तेथे क्युरिटीसाठी लॅब अावश्यक अाहे. मात्र, अनेक उत्पादकांनी हे नियमही धाब्यावर बसविले असल्याचे बाेलले जाते.

शेकडाेच्या अाॅक्सिजनसाठी हजाराे रुपये?
शासनाच्यानिकषानुसार अाॅक्सिजनची एमअारपी ठरविण्यात अाली अाहे. १२२ रुपयांना वितरकांना मिळणारे सिलिंडर रुग्णालयांना विविध प्रकारांनुसार उपलब्ध करून दिले जाते. मात्र, याच अाॅक्सिजनचे उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून तासाप्रमाणे किंवा दिवसाप्रमाणे साधारणत: ८०० ते एक हजार रुपये घेतले जात असल्याचे खासगी रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात अाले. असे असतानाही थाेडीशी रक्कम वाचविण्यासाठी अप्रमाणित सिलिंडर घेऊन काही रुग्णालयांकडून रुग्णांच्या जीविताशी खेळले जात असल्याचा प्रकार घडत अाहे, हे दुर्दैवच.

अाॅक्सिजन सारखा; धाेका मात्र माेठा...
अाैद्याेगिक वापराचे अाॅक्सिजन सिलिंडर कमी पैशात दिले जाते. या सिलिंडरची शुद्धता दर्जेदारच असली, तरी त्यांना हाताळणारे कामगार बहुतांशी अकुशल असतात. अाैद्याेगिक वापराच्या सिलिंडरमध्ये अाॅक्सिजनसह इतरही घातक वायू भरतात. त्यामुळे त्याच्या शुद्धतेची खात्री नसते. या मिश्रीत अाॅक्सिजनमुळे मरणासन्न स्थितीत उपचार सुरू असलेला रुग्ण काेमात जाऊ शकताे. याउलट मेडिकल वापरासाठीच्या अाॅक्सिजन सिलिंडरमध्ये शुद्धतेसह अनेक मानके असतात. ते हाताळणारे कामगारही कुशल असतात. त्यांच्यामार्फत अाैषध प्रशासनाचे नियम पाळले जातात. त्यामुळे रुग्णांना त्यातून प्राणवायूच मिळताे.

काॅलरला पांढरा रंग मारून वितरण
मेडिकलसाठी वापरल्या जाणाऱ्या अाॅक्सिजन सिलिंडरच्या काॅलरला पांढरा रंग दिलेला असताे. हा रंग म्हणजेच शुद्ध अाॅक्सिजन असलेले सिलिंडर समजण्यात येते. त्यानुसार उत्पादक कुशल कामगारांकडून असे सिलिंडर रिफील करतात. मात्र, विनापरवानगी अाॅक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्या वितरक अाैद्याेगिक कारणासाठीच्या सिलिंडर टाक्यांच्या काॅलरला पांढरा रंग मारून त्याची रुग्णालयांना विक्री करीत असल्याच्या घटना अलीकडे उघडकीस अाल्या अाहेत.

मालेगाव येथील एजन्सीचा अहवाल अप्रमाणित
मालेगावयेथील बालाजी एंटरप्राईजेस या विक्रेत्याने अाैद्याेगिक कारणासाठी वापरले जाणारे अाॅक्सिजन सिलिंडर रुग्णालयांना पाेहाेचविण्याचे काम सुरू केले हाेते. धुळे येथील उत्पादकांकडून संबंधित एजन्सीने अाॅक्सिजन सिलिंडर घेतले हाेते. हे सिलिंडर घेताना त्याचा वापर अाैद्याेगिक कारणांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात अाले हाेते. त्यानुसार संबंधित उत्पादक कंपनीने त्यांना अाैद्याेगिक वापरासाठीचीच बिले दिली हाेती. मात्र, बालाजी एंटरप्राईजेसच्या संचालकांनी हे सिलिंडर रुग्णालयांना पुरविण्याचे काम सुरू केले हाेते. अाैषध प्रशासन विभागाच्या पथकाला याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी संबंधित एजन्सीवर छापा टाकून कारवाई केली. सप्टेंबर २०१५ मध्ये ही कारवाई करण्यात अाली हाेती. या कारवाईनंतर अाॅक्सिजनचे नमुने सील करून अाैरंगाबाद येथील अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेत पाठविण्यात अाले. तेथील शासकीय विश्लेषकांनी अाॅक्सिजन रुग्णांसाठी अप्रमाणित असल्याचा अहवाल दिल्याने बालाजी एंटरप्राईजेसवर खटला दाखल करण्यात अाला अाहे.

स्वस्तिक एअर प्राॅडक्ट‌सचा अहवाल ‘नाे अाेपिनियन’
सिन्नरयेथील विठाेबानगरी अाैद्याेगिक वसाहतीतील स्वस्तिक एअर प्राॅडक्ट‌्स या कारखान्यात मेडिकल अाॅक्सिजनचे उत्पादन करून त्याची रुग्णालयांना विक्री केली जात हाेती. अन्न अाैषध प्रशासन विभागाचे सहअायुक्त हरिष बैजल (दक्षता) नाशिक विभागाचे सहअायुक्त भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्यावर अाैषध निरीक्षक हे. र. मेतकर, चंद्रकांत माेरे जीवन जाधव यांच्या पथकाने छापा टाकून २६ अाॅक्सिजनचे सिलिंडर जप्त केले हाेते. या सिलिंडरमधील अाॅक्सिजनचे नमुने घेऊन मुंबई येथील अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविले हाेते. मात्र, तेथील शासकीय विश्लेषकांनी तपासणी करताना ९२ टक्केच शुद्ध अाॅक्सिजनच्या अनुमानाची नाेंद करूनही ‘नाे अाेपिनियन’चा अहवाल दिल्याने अन्न अाैषध प्रशासन विभागाचे अधिकारी चक्रावून गेले अाहेत. रुग्णालयांसाठी वापरण्यात येणाऱ्या अाॅक्सिजनची शुद्धता ९९ टक्के असावी असे मानक असतानाही अस्पष्ट अहवाल देण्यामागचे गाैडबंगाल काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला अाहे.

मेडिकलसाठी वापरण्यात येणाऱ्या अाॅक्सिजन सिलिंडरसाठी उत्पादक कंपन्यांना १२२ रुपये एमअारपी ठेवण्याचे निर्देश शासनाने दिलेले अाहेत. एका माेठ्या सिलिंडरमध्ये केबीक मीटर अाॅक्सिजन असताे. याचाच अर्थ एक केबीकसाठी १७ रुपये ४६ पैसे दर निश्चित करण्यात अालेला अाहे. उत्पादक कंपनी त्यानुसार ट्रेडर्सला पुरवठा करते. ट्रेडर्स मात्र जादा दराने सिलिंडरचा पुरवठा करीत असतात. यातील स्पर्धेतून ग्राहकांना कमी दर देऊन अप्रमाणित सिलिंडरसाेबतच कमी वजनाचे सिलिंडर पुरविले जात असल्याची माहिती एका उत्पादकाने नाव छापण्याच्या अटीवर ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीला दिली अाहे.
भूषण पाटील, सहअायुक्त,अाैषध प्रशासन
शासकीय नियमाप्रमाणे उत्पादक कंपन्यांना १२२ रुपये ‘एमअारपी’
अाैद्याेगिक वसाहतीत वापरला जाणारा अप्रमाणित अाॅक्सिजन खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घशात घालण्याचा प्रकार मालेगाव सिन्नर तालुक्यात उघडकीस अाला हाेता. असा अाॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा अन्न अाैषध प्रशासन विभागाने पर्दाफाश करीत पुरवठादार अाॅक्सिजन उत्पादित करणाऱ्यांचे नमुने घटनास्थळीच सील करून ते शासनाच्या अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविले. मात्र, अाैरंगाबाद येथे नमुना म्हणून पाठविलेल्या मालेगाव येथील पुरवठादाराचा अप्रमाणित अहवाल, तर मुंबई येथील प्रयाेगशाळेत पाठविण्यात अालेल्या सिन्नर येथील अाॅक्सिजन उत्पादकाच्या नमुन्याची तपासणी करून शासकीय विश्लेषकांनी ‘नाे अाेपिनियन’चा अहवाल दिल्याने अाैषध प्रशासनालाच अाता अाश्चर्याचा धक्का बसला अाहे. या गंभीर प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
अस्पष्ट अहवालामुळे अाता शासकीय प्रयाेगशाळाच संशयाच्या भाेवऱ्यात
स्पष्ट अहवालाबाबत मुख्यालयाशी पत्रव्यवहार

{रुग्णांच्या घशात अाैद्याेगिक वापराचा अाॅक्सिजन घालणाऱ्या सिन्नर येथील कंपनीचा अहवाल ‘नाे अाेपिनियन’ म्हणून देण्याचे नेमके काय कारण? मग तुमच्या विभागाकडून फक्त कारवाईचा फार्सच केला जाताे का?
-अाम्हाला माहिती मिळताच अामच्या पथकाने छापा टाकला हाेता. छापा टाकलेल्या ठिकाणाहून जप्त केलेल्या सिलिंडरमधील अाॅक्सिजनचा नमुना तपासणीसाठी मुंबई येथील अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेत पाठविला हाेता. तेथून अालेल्या ‘नाे अाेपिनियन’बाबत तांत्रिक अडचणी असू शकतील.

{अस्पष्ट अहवाल देण्यामागे काहीतरी गाैडबंगाल असल्याचा संशय व्यक्त हाेेत अाहे. अापल्यामार्फत काय हालचाल करण्यात अाली?
-तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल देण्याचा अधिकार फक्त शासकीय विश्लेषकांना अाहे. नाे अाेपिनियनचा अहवाल प्राप्त हाेताच स्पष्ट अहवाल मिळावा यासाठी अाम्ही मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला अाहे. तिकडून अहवाल प्राप्त हाेताच याेग्य ती कारवाई केली जाईल.

{जिल्ह्याच्या अनेक भागांत विनापरवाना अशा प्रकारची उत्पादने घेतली जात अाहेत. अापल्या विभागामार्फत कारवाई का केली जात नाही?
-विनापरवाना उत्पादन करणाऱ्या पुरवठा करणाऱ्यांवर अामच्या पथकाची नजर अाहे. याच माध्यमातून अाम्ही सिन्नर येथील श्रृती गॅसेस या ट्रेडर्सविरुद्ध खटला दाखल केला अाहे. तसेच शहरातील शिंदे हाॅस्पिटल यांनी विनापरवाना अाैषध साठा ठेवल्याने २६ हजार रुपये तर सुशील मेडिकल अॅण्ड जनरल स्टाेअर्सला लाख ४० हजार रुपयांचा दंड केला अाहे.