आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या उद्याेगासाठी 76 एेवजी फक्त 25 परवाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यात नवा उद्याेग सुरू करण्यासाठी उद्याेजकाला घ्यावे लागणारे विविध परवाने, अनुदानांचा लाभ वेगाने िमळण्यासाठी ‘ई-साॅफ्ट डुइंग बिझनेस प्रणाली’ येणार अाहे. यामुळे आता नव्या उद्याेगासाठी ७६ ऐवजी २५ परवानेच लागतील, असे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे परवाने जलदगतीने मिळतील इतर शासकीय कामकाज वेगाने हाेणार असल्याने उद्याेजकांच्या अडचणी कमी हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी िदवसभर नाशिक दाैऱ्यावर अालेल्या देसाई यांनी ‘िनमा हाऊस’ येथे उद्याेजक संघटनांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यात विविध परवाने मिळविताना हाेणारा वेळेचा पैशांचा अपव्यय याकडे उद्याेजकांनी त्यांचे लक्ष वेधत ‘सिंगल विंडाे’ प्रणाली लागू करण्याची अावश्यक परवान्यांची संख्या कमी करण्याची मागणी केली, त्यावर देसाई बाेलत हाेते. उद्याेग उभारणीकरिता सध्या ७६ परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे उद्याेजकांचा वेळ ते िमळविण्यात त्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यातच जाताे हे वास्तव असून, त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरू केले अाहे. यासंदर्भात संबंधित िवभागांच्या मंत्र्यांच्या बैठकाही हाेत अाहेत. त्यानुसार, ७६ एेवजी २५ परवानेच उद्याेजकांना अाता घ्यावे लागतील. ते देण्यासाठीहीसंबंधित शासकीय विभागांना कालमर्यादा ठरवून िदली जाईल. कामकाज अधिक वेगाने व्हावे उद्याेजकांना िदलासा िमळावा, याकरिता ‘इ-साॅफ्ट डुइंग िबझनेस प्रणाली’ लागू करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. या वेळी एमअायडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, िनमाचे अध्यक्ष रवी वर्मा, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, अायमाचे अध्यक्ष विवेक पाटील, सीअायअायचे अध्यक्ष नंदू अहिरे, मंगेश पाटणकर व्यासपीठावर उपस्थित हाेते.
उद्याेगांसाठी इ-साॅफ्ट डुइंग बिझनेस प्रणाली
संबंधितशासकीय विभागांना कालमर्यादा ठरवून दिली जाईल. कामकाज अधिक वेगाने व्हावे उद्याेजकांना दिलासा मिळावा, याकरिता ‘इ-साॅफ्ट डुइंग बिझनेस प्रणाली’ लागू करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. या वेळी एमअायडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, िनमाचे अध्यक्ष रवी वर्मा, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, अायमाचे अध्यक्ष विवेक पाटील, सीअायअायचे अध्यक्ष नंदू अहिरे, मंगेश पाटणकर व्यासपीठावर उपस्थित हाेते.
फायर एनअाेसी हा असाच त्रासदायक प्रकार असून, यापुढे ताे केवळ उद्याेग सुरू करताना एकदाच घ्यावा लागेल. त्याचे नूतनीकरण करण्याची गरज नसेल, अशी घाेषणाही देसाई यांनी या वेळी केली.
सिंगल विंडाेची खिल्ली...
उद्याेजकांकडूनया परवानग्यांकरिता 'सिंगल विंडाे’ सुविधा अमलात अाणली जावी, अशी मागणी करण्यात अाली. मात्र,सिंगल विंडाे ही मायक्राेसाॅफ्टच्या विंडाेसारखी असते, एक विंडाे उघडली की दहा नव्या विंडाे समाेर येतात, असा अनुभव असल्याचे सांगत ‘इ-साॅफ्ट डुइंग िबझनेस’ ही प्रणाली त्यापुढील पाऊल असल्याचे देसाई म्हणाले.
उद्याेगांना सेवा-सुविधा देणे, भूखंडांचे वाटप किंवा इतर तत्सम छाेट्या-माेठ्या बाबी यापूर्वी एमअायडीसीच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठविल्या जात. त्यात हाेणारा प्रचंड कालापव्यय पाहता हे सर्व अधिकार अाता एमअायडीसीच्या प्रादेशिक अधिकारी कार्यालयांकडे देण्यात अाले अाहेत. खूपच अावश्यक बाबींच्याच फाइल्स मुंबईत पाठवाव्यात, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी या वेळी स्पष्ट केले.