आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indutralist, Businessmen Following No Car Day In Nashik

उद्योजक, व्यावसायिक नाशिकमध्‍ये प्रत्येक सोमवारी पाळणार ‘नो कार डे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आर्थिक संकटाचे प्रमुख कारण ठरलेल्या इंधन बचतीसाठी नाशिकमधील उद्योजक, व्यापारी संघटनाही आता सरसावल्या आहेत. नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅर्स असोसिएशन, अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅर्स असोसिएशन, नाशिक इंडस्ट्रियल को.ऑप.इस्टेट आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस अँड अँग्रीकल्चर यांच्यावतीने दर सोमवारी ‘नो कार डे’ पाळण्यात येणार असून त्याची सुरुवात येत्या सोमवारपासून (ता. 16 सप्टेंबर) करण्यात येणार आहे.

नांदगावकरांनी गेल्या दोन सोमवारी केलेल्या इंधन बचतीमुळे अनुक्रमे 90 हजार व दीड लाख रुपयांची बचत झाली होती. ‘दिव्य मराठी’ने इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद व नांदगावकरांच्या (जि. नाशिक) उपक्रमाचा आदश्र घेऊन ही मोहीम राबविण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. त्यानुसार दर सोमवारी किमान आठ ते दहा हजार कार रस्त्यावर येणार नाहीत. ज्यामुळे इंधनाच्या बचतीसह प्रदूषणासही आळा बसेल तर वाहनांची वर्दळही घटणार आहे.

इंधनाच्या आयातीपोटी देशाला मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागत असल्याने रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत असून महागाईही वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर नांदगावसारख्या तालुक्याच्या गावाने आठवड्यातील एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करण्याचा निर्णय घेतला होता. गेले दोन सोमवारी नांदगावकरांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.

या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच प्रत्येकाने आपल्यापासून इंधन बचतीला सुरुवात करण्याचे आवाहन ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात आले होते. त्याला शहरातील विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘निमा’च्या नाशिक, सिन्नर तर आयमाच्या अंबड, नाईसच्या सातपूर तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या अंतर्गत येणार्‍या 110 संघटना या अभियनात सहभागी होणार आहेत.


या संघटनांचे सभासद होणार सहभागी
निमा - 5500 , आयमा- 2200 , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस - 450 ,
नाईस -228, चेंबर अंतर्गत संघटना - 110


इंधन बचतीची गरज
इंधनाच्या आयातीवर वर्षाला देशाचे जवळपास 155 अब्ज डॉलर खर्च होत असून हे देशाच्या आजच्या गंभीर आर्थिक संकटाचे प्रमुख कारण आहे. इंधन वाचवणे गरजेचे असून हे अभियान त्याचाच एक भाग आहे. उद्योजकांकडून सोमवारी ‘नो कार डे’ जाहीर करण्यात आला असून या दिवशी आमचे सदस्य दुचाकी, सार्वजनिक वाहतूक, सायकल यांचा वापर करतील.’’ मनीष कोठारी, अध्यक्ष, निमा


दुचाकीचा वापर करणार
कारचे अँव्हरेज 12-14 किलोमीटर प्रतिलिटर असते तर दुचाकीचे 50-70 किलोमीटर. म्हणूनच इंधन बचतीचा उद्देश डोळय़ासमोर ठेवून येत्या सोमवारी आमचे सर्व सदस्य दुचाकींचा वापर करतील यामुळे किमान एका गाडीचे दोन लिटर पेट्रोल वाचू शकेल. सदस्यांनीही प्रक्रियेकरिता दिवसांत चारवेळा जो माल पाठवला जातो तो एकाच वेळी पाठवावा असेही आवाहन आम्ही करीत आहोत.’’ सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा