आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इएसअायसीला वर्षाला ६६ काेटींचे उत्पन्न ; तरी अाजारपण कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कामगारांच्या अाराेग्याची जबाबदारी घेतानाच त्यांना सामाजिक सुरक्षेचा वादा करणाऱ्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय नाशिक येथे अाहे. नाशिक जिल्ह्यातील लाख ७९ हजार १७४ कामगारांच्या वेतनातून ६६.१६ कराेड रुपयांची रक्कम दरवर्षी कपात हाेऊन इएसअायसीकडे जमा हाेते. कामगारांच्या घामातून कराेडाे रुपयांची रक्कम जमा हाेत असतानाही त्यांना त्या प्रमाणात दर्जेदार सुविधा मात्र मिळत नाहीत. छाेट्या-छाेट्या अाजारांसाठीही रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात अथवा अन्यत्र करार केलेल्या हाॅस्पिटलमध्ये पाठविले जाते. मुळात दरवर्षी ६६ कराेड रुपयांपेक्षा जास्त रक्कम कामगार विमा मंडळाकडे जमा हाेते. या तुलनेत कामगारांसाठी स्वतंत्र अद्ययावत हाॅस्पिटलची निर्मिती करणे सहजशक्य अाहे. मात्र, राज्य केंद्राच्या अनास्थेमुळे अाजही कामगार वाऱ्यावर अाहे. इएसअायसीच्या या कारभारावर डी. बी. स्टारचा हा प्रकाशझाेत.. 
 
सातपूर येथे इएसअायसीचे मुख्य रुग्णालय अाहे. बहुतांश रुग्णांवर बाह्य उपचार करून साेडून दिले जाते. मात्र, गरजू रुग्णांना अावश्यकतेनुसार दाखल करून घेतले जाते. अशा रुग्णांना उपलब्ध साधनसामग्री कर्मचारी संख्येच्या बळावर रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून केला जाताे. अाधुनिकतेच्या जाेरावर वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशाेधन तंत्रज्ञान येत असताना इएसअायसीमध्ये मात्र जुनी उपकरणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या बाह्य तपासणीसाठी येणाऱ्या कामगार रुग्णांची संख्या बघता स्थानिक प्रशासनाचे हे प्रयत्न ताेकडे पडतात. लाखाे कामगारांशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अाहे. 
उपसंचालक, इएसअायसी 
के. सी. झा 
अाता दिल्लीत अांदाेलन 
^कामगारत्यांच्याकुटुंबीयांना अद्ययावत वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी इएसअायसीची अाहे. मात्र, केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून या याेजनेचे कामकाज केले जात असल्याने कामगारांसह प्रशासकीय कर्मचारीही अधांतरी अाहेत. ही याेजना पूर्णत: राज्य वा केंद्राने चालवावी यासाठी मुंबई दिल्लीत अाम्ही निदर्शने करणार अाहाेत. डाॅ.डी. एल. कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीटू 

नाहीतर मुंबईला रुग्ण 
^इएसअायसीच्यारुग्णांवरअाम्ही येथेच उपचार करण्यासाठी प्रयत्न करताे. मात्र कान, नाक, घसा नेत्रराेग संदर्भातील रुग्णांना सिव्हिलमध्ये पाठविताे. परंतु, जर रुग्णांची तशी इच्छा नसेल तर अाम्ही त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या इएसअायसीमध्ये पाठवू. अाम्ही उपचार करण्यास तयार अाहाेत, मात्र, त्या प्रमाणात यंत्रसामग्री नसल्याने अडचणी येतात. डाॅ.सराेज जवादे, वैद्यकीयअधीक्षक इएसअायसी 

शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक रुग्णालयात काॅटरी यंत्र असते. शस्त्रक्रिया करतेवेळी रक्त थांबविण्यासाठी या यंत्राचा उपयाेग हाेताे. मात्र, इएसअायसीमध्ये हे यंत्रच उपलब्ध नसल्याचे समजते. 

कामगारांच्या वेतनातून दरमहा १.७५ व्यवस्थापनाकडून ४.७५ अशी ६.५० टक्के रक्कम कपात हाेते. ही रक्कम दरमहा साडेपाच कराेड रुपयांहून जास्त अाहे. तरीही रुग्णालयात सिटीस्कॅन, साेनाेग्राफी, पॅथाॅलाॅजी लॅब, एम.अार.अाय, एक्स-रे यांसारखी अद्ययावत यंत्रसामग्री रुग्णालयात उपलब्ध नाहीत. तसेच नाक, कान, घसा, अस्थिराेग, स्त्रीराेग, बालराेग, दंतराेग, अतिदक्षता विभागाचा अभाव अाहे. 

कामावर असताना मृत पावलेल्या २८९ कामगारांच्या कुटुंबीयांना इएसअायसीमार्फत पेन्शन दिली जाते. अाई-वडील हयात असेपर्यंत, मुलगा २५ वर्षांचा हाेईपर्यंत, मुलीचे दुसरे लग्न हाेईपर्यंत पत्नी विधवा असेपर्यंत पेन्शन देण्याची याेजना अाहे. तसेच कामावर असताना कायमचे अपंगत्व अालेल्या १२०२ कामगारांना पेन्शन दिली जात अाहे. 

जुनीच अाैषधसूची 
रुग्णालयात गेल्या १५ वर्षांपासून अाैषधाच्या अनुसूचीमध्ये बदल करण्यात अालेला नाही. त्यामुळे नवीन प्रगत अाैषधे उपयाेगात अाणली जात नाहीत. रुग्णालयाच्या अाैषध सूचीत बदल करण्याची अावश्यकता अाहे. 

नाशिकच्या दिमतीला अाैरंगाबादची रुग्णवाहिका 
रुग्णालयाच्या स्थापनेनंतर मुंबईहून जुनी रुग्णवाहिका नाशिकला देण्यात अाली हाेती. मात्र, कालांतराने ती सतत नादुरुस्त हाेऊ लागल्याने तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. एस. एल. थाेरात यांनी पाठपुरावा करून अाैरंगाबादला मिळालेल्या दाेन नवीन रुग्णवाहिकांपैकी १९९८ मध्ये एक रुग्णवाहिका नाशिकला अाणली हाेती. अाजमितीस या रुग्णवाहिकेला १९ वर्षे पूर्ण झाली असून तीदेखील कायम नादुरुस्त हाेत असते. 

रुग्णालय स्थापनेपासून वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त 
इएसअायसीहाॅस्पिटलच्या स्थापनेपासून रुग्णालयाला कधीही पुरेसा कर्मचारीवर्ग प्राप्त झालेला नाही. १९९१ पासून हाॅस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षकपद रिक्त अाहे. त्यामुळे कायम प्रभारी म्हणून कामकाज बघणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांना ठाेस निर्णय घेण्यास अडचणी येतात. सध्या तर वैद्यकीय अधीक्षकांनी एखादा निर्णय घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला तर त्यास मंजुरी मिळेपर्यंत रुग्णालयात दुसऱ्या वैद्यकीय अधीक्षकांची नेमणूक झालेली असते.

ताेकड्या संख्याबळावर कामकाज सुरू 
इएसअायसीमध्येवर्ग ची अाठ पदे रिक्त अाहेत. अाैषधनिर्माताची १६ पदे मंजूर असून, केवळ पाच फार्मासिस्टवरच रुग्णालयासह सेवा दवाखान्यांचे कामकाज सुरू अाहे. वर्ग ची १५० मंजूर पदांपैकी ८० पदे रिक्त अाहेत. वर्ग मधील परिचारिका, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ यांची ४५ पदे रिक्त अाहेत. रुग्णालयात २४ परिचारिकांना अस्थायी स्वरूपाची नेमणूक देण्यात अाली अाहे. सर्वच पदे रिक्त असल्याने अापसूकच त्याचा रुग्णसेवेवर परिणाम हाेत अाहे. 
पासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त 

अार्थिक उत्पन्न कमी असलेल्या कामगारांना अाराेग्य सुरक्षा मिळावी म्हणून केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून इएसअायसी चालवले जाते. जवळपास दाेन लाख कामगारांच्या वेतनातून वर्षाकाठी ६६ काेटी रुपयांची गंगाजळीही जमा केली जाते. एवढा पैसा घेऊनही कर्मचाऱ्यांना अाराेग्य सुविधा काही मिळत नाहीत. मग दरवर्षी जमा हाेणारा हा एवढा पैसा जाताे कुठे असा प्रश्न निर्माण हाेताे. इएसअायसीच्या कारभाराचे डी. बी. स्टारने केलेले हे अाॅपरेशन... 

यंत्रसामग्री मुदतबाह्य 
सातपूरला सन १९९० ला इएसअाय हाॅस्पिटलची निर्मिती करण्यात अाली. त्यावेळी हाॅस्पिटलमध्ये नवीन एक्स-रे मशिन अाणण्यात अाले हाेते. तसेच पॅथाॅलाॅजिकल लॅबमधील यंत्रसामग्रीही नवीन अाणण्यात अाली हाेती. मात्र, रुग्णालय सुरू हाेऊन २७ वर्षांचा कालावधी लाेटला अाहे. तरीही अद्याप एकही यंत्रसामग्री नवीन अालेली नाही. 
 
२८९ कामगारांच्या कुटुंबीयांना मृत्यूपश्चात लाभ 
छाेट्या-छाेट्या अाजारांसाठीही रुग्णांना जावे लागते जिल्हा शासकीय रुग्णालयात वा अन्यत्र 
काॅटरी यंत्रच नाही 
 
अद्ययावत यंत्रसामग्रीचा अभाव 
{रुग्णालयात सुविधा नाहीत? 
{कामगारांच्यावेतनातून कपात केलेल्या रकमेतून वैद्यकीय सेवा तसेच कामावर मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व अाल्यास वेतनाच्या ९० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. यासह विविध प्रकारच्या १३ सेवा पुरविल्या जातात. 
{अत्याधुनिकयंत्र नसल्याने रुग्णांना अन्यत्र जावे लागते 
{रिजनलबाेर्डाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल. तसेच या पुढे टायअप हाॅस्पिटलमध्येच रुग्ण पाठविण्यात येईल. तेथे रुग्णांना पैसे खर्च करण्याची गरज नाही. 
{इएसअायसीच्यासुलभ सेवेसाठी काय ठाेस प्रयत्न 
{कामगारांनाइएसअायसीची सेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने अाम्ही सिन्नर, दिंडाेरी, घाेटी या परिसरात इएसअायसीची शाखा कार्यालये सुरू करणार अाहाेत. 
बातम्या आणखी आहेत...