आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन’मध्ये जागेवरच सामंजस्य करार करण्याची एमअायडीसीकडून तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यात नवी अाैद्याेगिक गुंतवणूक यावी यासाठी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनतर्फे मुंंबईत ३० अाणि ३१ मे राेजी अायाेजित करण्यात अालेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमासाठी सहअायाेजक म्हणून एमअायडीसी काम करत अाहे. याच अनुषंगाने उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी अातापर्यंत तीन वेळा मुंबईत बैठका घेऊन मार्गदर्शन अाढावा घेतला अाहे. एमअायडीसीलाही या उपक्रमातून अाैद्याेगिक गुंतवणूकीच्या माेठ्या अपेक्षा असून, या दाेन्ही दिवशी गुंतवणुकीस उत्सुक असलेल्या उद्याेगांशी जागेवरच सामंजस्य करार ( एमअाेयू) करण्याची तयारी करण्यात अाली अाहे. नाशिक जिल्ह्यात एमअायडीसीच्या जमीनींसह पायाभूत सुविधांची उपलब्धता, नाशिकमध्ये अाैद्याेगिक गुंतवणूक का करावी? याबाबतची माहिती देणारे सादरीकरणही केले जाणार अाहे. 
 
देशातील गुंतवणूकदारांना या उपक्रमासाठी निमंत्रित करण्यात अाले असून, त्यांच्यासमाेर केल्या जाणाऱ्या सादरीकरणात अंबड, सातपूर यांसारख्याअाैद्याेगिक वसाहतींत उपस्थित असलेल्या माेठ्या उद्याेगसमूहांची माहिती दिली जाणार अाहे. यांसह सिन्नर, दिंडाेरी, मालेगाव, येवला, विंचूर येथे एमअायडीसीकडे उपलब्ध असलेल्या, भूसंपादन केलेल्या अाणि प्रस्तावित असलेल्या जमिनी, पायाभूत सुविधांची उपलब्धता अाणि उद्याेगांसाठीच्या क्षमता यांचा या सादरीकरणात समावेश असेल. याशिवाय वाइन पार्क, फूड पार्क यासाठी उपलब्ध असलेल्या एमअायडीसीकडील जमिनींची माहितीही दिली जाणार अाहे. अनेक वर्षांपासून बांधून पडलेल्या अायटी पार्क इमारतीसह अायटी पार्कमधील माेकळे असलेले एकरच्या भूखंडाची माहितीही यात सादर केली जाणार अाहे. 

एमअायडीसीकडे जिल्ह्यातून अन्नप्रक्रिया उद्याेगांच्या उभारणीसाठी जागेची माेठी मागणी हाेत अाहे. कृषिप्रधान बहुविविधता असलेली पिके यामुळे अशा प्रकल्पांचा हब येथे उभारला जावा, अशी मागणी सातत्याने हाेत अाहे. यामुळे विंचुर फूड पार्कची ५० हेक्टर जमीन तर अतिरिक्त विंचूर वाइन पार्कची ६५ हेक्टर अाणि िवंचूर वाइन पार्कची १८ हेक्टर जमीन वापरता येऊ शकते. जेथे बऱ्याचअंशी पायाभूत सुविधांची उभारणी झालेली अाहे. 

गुंतवणुकीचा अाेघ सुरू हाेण्यास उपक्रम साहाय्यभूत 
^‘मेकइननाशिक’ या उपक्रमासाठी एमअायडीसी सहअायाेजक म्हणून काम करत अाहे. या उपक्रमात अामचा स्टाॅल असेल अाणि जिल्ह्यात गुंतवणूक का करावी? याचे सादरीकरणही अाम्ही करणार अाहाेत. जागेवरच सामंजस्य करार करण्याचीही तयारी अाम्ही ठेवली अाहे. त्यामुळे या उपक्रमातून बहुतप्रतीक्षित अाैद्याेगिक गुंतवणूकीचा अाेघ सुरू हाेऊ शकेल. -हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमअायडीसी 

 
बातम्या आणखी आहेत...