आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांतच विकास निधीची तरतूद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची विशेष अंदाजपत्रकीय महासभा शुक्रवारी (दि. २५ ) सकाळी ११.३० वाजता हाेणार अाहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे महासभेला अंदाजपत्रक सादर करतील. भाजपचे प्रभावक्षेत्र नसलेल्या प्रभागांत विकास कामांना फारसा निधीच दिला नसल्याची तक्रार करण्याच्या पावित्र्यात काही नगरसेवक अाहेत. 
 
अंदाजपत्रकीय सभेत अंदाजपत्रकावर गरमागरम चर्चा हाेण्याची शक्यता अाहे. २०१७-१८ या अार्थिक वर्षासाठी महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४१.०७ काेटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले हाेते. त्यात मिळकत करात १४ टक्के, तर पाणीपट्टीत टक्के दरवाढ सूचविण्यात अाली हाेती. अायुक्तांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ३८९ काेटींची भर घातली अाहे. व्यावसायिक मिळकत पाणीपट्टी दरात वाढ करण्याची शिफारस महासभेला केली अाहे. याशिवाय काही प्रकल्प बीअाेटी तत्वावर उभारण्यासाठीही तरतूद केली अाहे. स्थायीने वाढ केल्याने एकूण अंदाजपत्रक अाता १,७९९ काेटी रुपयांवर गेले असून, महासभा त्यात भर घालणार अाहे. दरम्यान, अंदाजपत्रकात काही प्रभागांसाठी विकास निधीची तरतूदच केली नसल्याचा अाराेप विराेधी पक्षातील काही नगरसेवक करत अाहेत. त्याचे पडसादही महासभेत उमटण्याची शक्यता अाहे. 
 
विषयसमित्यांसंदर्भात अायुक्तांनी महासभेत प्रस्ताव सादर केला नसल्याने, तसेच या समित्यांच्या कामकाजाचे नियमही अद्याप स्पष्ट नसल्यामुळे ताे महासभेच्या पटलावर सादर करण्यात येऊ नये, अशी भूमिका महापालिकेतील विराेधी पक्षांनी घेतली अाहे. यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी अाणि अपक्ष नगरसेवकांची पालिकेत गुरुवारी संयुक्त बैठक झाली. दरम्यान, शुक्रवारी (दि. २६) हाेणाऱ्या महासभेत शहर सुधार, विधी अाराेग्य या तीन विषय समित्यांची घाेषणा केली जाणार अाहे. 

महापालिकेत सहज सत्ता प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेवकांना महापाैर, उपमहापाैर, स्थायी समिती सभापती या तीनही महत्वाच्या पदांवर विराजमान हाेण्याची संधी मिळाली. त्यात अाता विधी, शहर सुधार आरोग्य या तीन समित्यांवर भाजपच्या सदस्यांची वर्णी लागणार अाहे. यंदा भाजपचे ६६ नगरसेवक निवडून अाले अाहेत. संख्याबळानुसार नऊ सदस्य असलेल्या समितीत भाजपचे पाच सदस्य सामावले जाणार अाहेत. परिणामी, सभापतीही भाजपचाच हाेणार अाहे. शिक्षण समिती, विधी, शहर सुधार आणि अाराेग्य अशा चार समित्यांमध्ये भाजपच्या जवळपास २४ नगरसेवकांना स्थान दिले जाणार अाहे. यातील चार सदस्यांना सभापती हाेण्याची संधी मिळेल. या पार्श्वभूमीवर विराेधी पक्षाने सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावालाच विराेध केला अाहे. महासभेवरचे प्राकलने हे अायुक्तांनी सादर करणे गरजेचे असताना या प्राकलनाच्या बाबतीत तसे दिसत नाही. 

तसेच, या समित्यांच्या जबाबदाऱ्या अाणि कार्यक्षेत्रे काेणते असतील, निधी मंजुरीचा अधिकार त्यांना असेल का, बाबत अनभिज्ञता अाहे. शिवाय नवीन नगरसेवकांना या समित्यांचे कामकाज समजून घेण्यातच वेळ जाईल. त्यामुळे हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर घेण्यात येऊ नये, अशी भूमिका विराेधी पक्षांनी घेतली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...