आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षण हक्क’ प्रवेश, आज शेवटची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू शकलेल्या आणि सहाव्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवारी (दि. २६) अखेरची मुदत राहणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 
शिक्षण हक्क प्रवेशासाठी सोमवारी (दि. २२) सहावी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात १६ शाळांतील रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली असून पालकांना २६ मेपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावयाचा आहे. ‘शिक्षण हक्क’अंतर्गत पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आतापर्यंत तीन हजार ५५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात असून, यंदा ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर पहिली सोडत जाहीर करण्यात आली होती. पहिल्या पाचही फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑनलाइन अर्ज करूनही प्रवेश मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता अखेरची सोडत काढण्यात आली आहे. शहरातील काही शाळांकडेच मोठ्या संख्येने प्रवेश अर्ज आल्याने या शाळांतील प्रवेशाच्या जागा पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे १६ शाळांतील रिक्त जागांसाठी शिक्षण विभागातर्फे सोडत काढण्यात आल्या असून पात्र विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार अार्थिक दुर्बल घटकातील मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात अाली हाेती. यासाठी पाच फेऱ्या राबविण्यात अाल्या हाेत्या. सहावी अखेरची फेरी हाेती. 
 
बातम्या आणखी आहेत...