आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटना करणार बँकेच्या जप्तीच्या नोटिसांची होळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने व काही राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज थकबाकी वसुलीपाेटी मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसा पाठवल्या अाहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे महाराष्ट्र शासन सांगते.  विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत. मात्र, सहकार खात्याने जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याचे अादेश दिले अाहेत. हे दुटप्पी धाेरण असून  रोज शेतकरी आत्महत्या वाढत असताना जप्तीपूर्वच्या नोटिसा देऊन शासन आणि बँका शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी केला. अाम्ही या नाेटिसांची हाेळी करू, असे निवेदन त्यांनी येवल्याच्या  तहसीलदारांना सोमवारी दिले. 

शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन चांगले उत्पादन केले. पण कांद्याला २०० ते ५०० रु. क्विंटल भाव, भाजीपाला फळ पिके रस्त्यात फेकावी लागली, तुरीला बारा हजार रुपये भाव मिळत असताना आयात करून भाव ३ ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...