आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरवाडीत विस्कळीत पाणीपुरवठा, संतप्त महिलांचा पालिका अधिकाऱ्याला घेराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - मोरवाडीगाव प्रभाग क्रमांक २७ येथे मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून पाणी भरावयास लावले. नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत पाण्याच्या प्रश्नाबद्दल जाब विचारला. काही महिलांनी अधिकाऱ्यांसमाेर पाण्याचे भांडे उलटे केले. दोन दिवसांत पाणी आल्यास माेर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला. 
 
सिडकोतील मोरवाडी भागात १५ दिवसांपासून पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी पाणीच येत नाही. तर काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी येते. काही ठिकाणी कमी वेळ पाणी येत असल्याने पाणीच भरता येत नाही. काही नागरिकांना खड्ड्यातून पाणी भरावे लागत आहे. अनेकांनी पाणी येत नसल्याने नळाच्या तोट्या काढून पाईपने पाणी भरणे सुरु केले आहे. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. सिडकोतील काही भागात पाणीच पाणी असून, हे पाणी थेट रस्त्यावर वाहते. तर काही भागात पाण्याचा एक थेंबही नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे महिला वर्ग त्रस्त आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असताना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला समाेरे जावे लागत अाहे. गुरुवारी सायंकाळी पाणी अाल्याने महिलांनी एकत्र येत नगरसेविका किरण दराडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. महिलांनी पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांना पाणी येत नसल्याबद्दल जाब विचारला. भामाबाई घुगे, बेबीताई येवले, येनूबाई गामणे, सिंधुताई सोनवणे, गंगूबाई उगले, जयश्री गामणे, वत्सला गामणे, संगीता जायभावे, बाळा दराडे, संपत जायभावे, संजय जायभावे, संजय गामणे, विकी सांगळे, अमोल गामणे, सागर गामणे, संदीप लहाने आदीसह नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास मोर्चाचा इशारा दिला आहे. 

पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल 
^काहीतांत्रिकअडचणीमुळे पाणीपुरवठा कमी प्रमाणात येत असेल. मात्र आणि तो लवकरच सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वाना योग्य प्रमाणात पाणी मिळेल. -संजीव बच्छाव, पाणी पुरवठा अधिकारी, सिडको 

नाहीतर तोंडाला काळे फासू 
^धरणातपाणी योग्य प्रमाणात असताना पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. दोन दिवसांत पाणी प्रश्न सुटला नाहीतर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू. -किरण दराडे, नगरसेविका. 

पाणीच भरायला लावले. 
^नळाला पाणीयेत नसल्याने घरातील सर्व भांडे रिकामे आहेत. पाणी अाले तर जेमतेम एक हंडाही भरला जात नाही. म्हणून आज पाणी पुरवठा अधिकाऱ्याला पाणीच भरायला लावले. मग त्याला कळेल काय परिस्थिती आहे ते. -भामाबाई घुगे, ज्येष्ठ नागरिक. 

अधिकाऱ्यांना भरायला लावले पाणी 
अनेक महिलांनी पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांच्याकडे पाणीपुरवठ्याबद्दल तक्रारी केल्या. मात्र, त्यांची उत्तरे ऐकून संतप्त महिलांनी घेराव घातला. काहींनी त्यांना पाणीच भरायला लावले. आणि सांगितले कमी दाबाने येणारे पाणी किती वेळ भरायचे ते भरून दाखवा. काहींनी हाताला धरून ओढून नेत बच्छाव यांना पाण्याची परिस्थिती दाखविली. 

 
बातम्या आणखी आहेत...