आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणीचे व्हॉट्सअॅप हॅक करणारा जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गृहिणीचा व्हाॅट्सअॅप नंबर हॅक करत अश्लील मेसेज करणाऱ्या सांगलीच्या हॅकरला सायबर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि. १३) पथकाने कडेगाव येथे कारवाई केली. 
महिन्यापूर्वी सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुटवडनगर परिसरातील एका गृहिणीचे व्हाॅट्सअॅप अकाउंट हॅक करत या महिलेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ कॉल करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. संशयिताच्या माेबाइल क्रमांकाच्या अाधारे सीडीआर, एसडीआर आणि आयपी अॅड्रेस शोधून काढला. महेंद्र यशवंत जगदाळे (२२, रा. अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी पथक सांगली येथे रवाना झाले. अंबक गावात संशयिताच्या घरी जात त्यास अटक केली. न्यायालयात हजर केले असता जगदाळेस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात अाले. संशयिताची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

गरज पडल्यास संशयिताचा ताबा 
^तपासात संशयिताने तक्रारदार महिलेचा व्हाॅट्सअॅप अकाउंट हॅक केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर महिलांचे अकाउंट हॅक केल्याची तक्रार नाही. गरज पडल्यास तपासकामी त्याचा ताबा घेण्यात येईल. -अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 
बातम्या आणखी आहेत...