आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitaran Collecting Information For Power Supply During Kumbha Mela In Nashik

सिंहस्थासाठी लागणाऱ्या विजेबाबत चाचपणी, ‘महावितरण’ने सर्वच विभागांकडून मागितले प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाढीव वीज लागणार असल्याने त्याची आतापासूनच तजवीज करावी लागणार आहे. त्यामुळे नेमकी किती वाढीव वीज लागणार आहे, याचा अंदाज येणे अपेक्षित असून, सर्वच विभागांनी आपल्याला किती वीज लागेल, याची माहिती लवकरात लवकर सादर करावी, असे पत्रच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्हा प्रशासनासह सिंहस्थाचा प्रत्यक्ष संबंध असलेल्या १५ विभागांना दिले आहे.
सिंहस्थाची तयारी सर्वच विभागांकडून सुरू आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा वेळेत आणि योग्य मिळाव्यात, यासाठी सर्वच विभागांची लगबगही सुरू आहे. त्यानुसार, वीज वितरण कंपनीनेही सिंहस्थ कालावधीत लागणाऱ्या विजेची तजवीज करण्यासाठी सर्वच शासकीय विभागांकडून त्यांना आवश्यक असलेल्या विजेची मागणी किलो वॅटमध्ये कळविण्यास सांगितली आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, नाशिक मनपा, पोलिस आयुक्त, बीएसएनएल, वन विभाग, आरोग्य उपसंचालक, सार्वजनिक बांधकाम, जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पर्यटन विकास महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय यांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची आणि ते योग्य पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या सर्वच विभागांना वीज वितरण कंपनीच्या वतीने पत्रही देण्यात आले आहे.