आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information Of Government Scheme On Sms Is Proving Headache For People

एसएमएसचा फार्स; सर्वसामान्यांना त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी वा अन्य कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला घरबसल्या केवळ संदेशाद्वारे माहिती देण्याची शासनाची योजना निव्वळ फार्स ठरत आहे. नागरिकांशी नेहमीच संबंध येणार्‍या सरकारी विभागांच्या उदासीनतेमुळे आता माहिती मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येत आहे. यात अधिकारी, कर्मचारी जागेवर नसले तर पुन:पुन्हा वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसा खर्च करण्याची कसरत नागरिकांना करावी लागत असल्याने या योजनेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत..


योजना नव्हे, निव्वळ फार्स

तालुका कृषी कार्यालयात प्रत्येक योजनेसाठी अर्जावर मोबाइल क्रमांक लिहून घेतले जातात. मात्र, कृषी अधिकार्‍यांना वारंवार सांगूनदेखील एसएमएस मिळत नाहीत. शासनाचे धोरण अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे निव्वळ फार्स ठरते. - भाऊसाहेब कुंभार्डे, शेतकरी

नवीन सभासदांना सेवा नाही

नवीन सभासद झालेल्या शेतकर्‍यांना ही सेवा सध्या उपलब्ध नसून, पूर्वी जे शेतकरी सभासद झाले आहेत त्यांना एसएमएस सेवा सुरू करून देण्यात आली आहे. - मधुकर पन्हाळे, जिल्हा कृषी अधीक्षक

ती आमची जबाबदारी नाही

शासनाच्या योजनांपैकी एसएमएस सेवादेखील सुरू आहे. मात्र, आता आम्ही लाभार्थ्यांना एसएमएस पाठवत नसून, उद्योजकच पात्रतेनुसार उमेदवारांना एसएमएस पाठवतात. आम्ही केवळ मार्गदर्शन करतो. - एम. एन. धाकड, जिल्हा अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय

चार वर्षांत एकही एसएमएस नाही

मी रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्राकडे चार वर्षांपूर्वीच नाव नोंदवले. मात्र, अद्यापपर्यंत एकही कॉल किंवा नोकरीचा एसएमएस आलेला नाही. - सुदाम सानप, उमेदवार

थकीत प्रकरणांनाच संदेश

आम्ही एसएमएस पाठवतो. मात्र, मोबाइल क्रमांक नसल्यास अडचण होते. संगणकीकरणामुळे संबंधितांना एसएमएस पाठविता येतात. - शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी, जातपडताळणी समिती