आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infringement Proceedings Against All party Protest Rally

अतिक्रमण कारवाईविरोधात सर्वपक्षीयांचा निषेध मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय हॉकर्सने टपरीधारक, फळ, भाजीपाला विक्रेते व फेरीवाला कृती समितीने बुधवारी विभागीय महसूल कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी उपायुक्त सतीश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली.
भाजप महासंघाचे युनूस सय्यद, हॉकर्स सेना जिल्हाध्यक्ष शिवाजी भोर, पीपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
आडमुठय़ा धोरणामुळे छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने हस्तक्षेप करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युनियनचे शहराध्यक्ष राजेंद्र मोरे, दस्तगीर बाबा शेख, हॉकर्स सेलचे सरचिटणीस बाळासाहेब उगले, भाजप महासंघाचे सरचिटणीस नवनाथ ढगे, महाराष्ट्र हॉकर्स सेनेचे शहराध्यक्ष वाल्मिक बागुल, सरचिटणीस सोमनाथ मोरे, दिनेश जाधव, संतोष वाघमारे, जयद्रथ काकडे आदींचा सहभाग होता.
मोकळा श्वास
कृती समितीने गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे मोहिमेशिवाय परिसर अतिक्रमणमुक्त झाल्याचे चित्र नाशिकरोडला होते. त्यामुळे नागरिक, वाहनचालकांनी मुक्तपणे रुंद रस्त्यावरून फिरण्याचा आनंद लुटला.असेच चित्र कायमस्वरुपी असावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या आहेत प्रमुख मागण्या
नॅशनल हॉकर्स पॉलिसी राबवावी. न्यायालयाच्या निर्णयानुसार रस्त्यावरील व्यावसायिकांच्या पुनर्वसनानंतर अतिक्रमण हटविण्यात यावे. शासनाच्या हॉकर्स धोरणानुसार समिती गठित करून विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य म्हणून घ्यावेत.