आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ शिक्षकांची अधिकाऱ्यांकडून चौकशी, मुख्याध्यापक सावंत, जावरे यांच्या बदलीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- पिंपळगाव जलाल जि.प. प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षकाला शाळेतीलच एका शिक्षकाने मारहाण केल्यानंतर ग्रामस्थांनी अकार्यक्षम मुख्याध्यापक मारहाण करणाऱ्या शिक्षकाची शाळेवरून इतरत्र बदली करावी यासाठी शाळेला शनिवारी कुलूप ठोकले होते. सोमवारी लोकप्रतिनिधी गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी शाळेचे कुलूप काढून घेतले. गटविकास अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन यावेळी दिले. दरम्यान, गटशिक्षणाधकारी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी दिवसभर शाळेतील शिक्षकांची चौकशी सुरू होती. 

पिंपळगाव जलाल शाळेतील आदर्श शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांना शनिवारी मुख्याध्यापकांच्या दालनातील बैठकीत उपशिक्षक राम जावरे यांनी मारहाण केली होती. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी अकार्यक्षम मुख्याध्यापक सावंत उपशिक्षक राम जावरे यांची बदली करावी यासाठी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे सोमवारी शिक्षकांनी शाळेच्या वऱ्हांड्यातच शाळा भरवली. 

यानंतर पावणेबारा वाजता पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख वाल्मीक गोरे, शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, उपसभापती रूपचंद भागवत, गटविकास अधिकारी सुनील अहिरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी मंदाकिनी लाडे, मंगला कोष्टी, कांतीलाल साळवे, दिलीप मेंगाळ, विठ्ठलराव आठशेरे आदींनी पिंपळगाव जलाल येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली.यावेळी मुख्याध्यापक सावंत शिक्षक जावरे यांच्या बदलीची मागणी ग्रामस्थांनी केली.मुख्याध्यापकांच्या दालनातील बैठकीत संभाजी पवार यांनी ग्रामस्थांना काय करायचे असा सवाल केला. मात्र, ग्रामस्थ भूमिकेवर ठाम होते. सरपंच भारती भोरकडे, ग्रामपंचायत सदस्य कैलास खोकले, शिवनाथ खोकले, सहादू वाघ, विनायक भोरकडे, विजय भोरकडे, संतोष धिवर आदींसह ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला. संभाजी पवार यांनी ग्रामस्थांसमोर मुख्याध्यापकांसह दोघांना निलंबित करण्याची सूचना मांडली. यावर ग्रामस्थांनी शिक्षक चंद्रशेखर दंडगव्हाळ यांचे शैक्षणिक काम चांगले असून, त्यांच्यावर अन्याय का करता? असा सवाल केला. यावेळी ग्रामस्थ बाजू मांडत असताना लोकप्रतिनिधींनी त्यांना बोलू दिले नाही. 

मुख्याध्यापकांच्या दालनात चर्चा सुरू असताना गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी शिक्षकांची चौकशी करू, दोषींवर कारवाई करू मात्र शाळेबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्या, अशी विनंती करीत ग्रामस्थांना शाळेच्या चाव्या आणण्याची सूचना केली. ग्रामस्थांनीही शाळेच्या चाव्या आणून लावलेले कुलूप उघडले. 

गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी त्वरित प्रभारी गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांच्यासह विस्तार अधिकारी लाडे कोष्टी यांची समिती बनवून शाळेचे मुख्याध्यापक मोहन सावंत यांच्यासह सर्व शिक्षकांची चौकशी करून जबाब नोंदवण्यास सांगितले. कोळी यांनी सावंत, जावरे, दंडगव्हाळ यांच्यासह इतर शिक्षकांनाहीा बोलावून प्रत्येकाची चौकशी केली. 
बातम्या आणखी आहेत...