आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना उलगडले शिल्पकलेचे रहस्य, आयडिया कॉलेजात ‘एक्सक्लेम 2017’ प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आयडिया कॉलेजचे ‘एक्सक्लेम २०१७’ हे वार्षिक प्रदर्शन सध्या कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, नाशिक येथे सुरू असून यात प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शिल्प बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण‌्यात अाले. यावेळी नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार श्रेयस गर्गे यांनी अवघ्या काही तासांत प्रत्यक्ष मूर्ती कशी घडते याचे धडे विद्यार्थ्यांना दिले. 
 
विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन एनव्हायर्न्मेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज नाशिकमध्ये कार्यरत आहे. शिल्पकला आणि स्थापत्यकला यांचे फारच जवळचे नाते आहे. हे ओळखून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एखादी मूर्ती कशी बनते हे समजावून देण्यासाठी या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात अाली. 
 
यासाठी शिल्पकार श्रेयस गर्गे यांना बोलविण्यात आले होते. यावेळी एका विद्यार्थ्यांला समोर उभे करून बोटांची किमया दाखवत अवघ्या काही तासांत त्यांनी सुबक शिल्प साकारले. या प्रदर्शनासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इबको, फिनोलेक्स पाईप आणि अपोलो पेट यांनी अर्थ सहाय्य दिले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...