आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधानः विम्यावर कर्जाचे आमिष दाखवून अशीही फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सावधान... तुम्‍हालाही अशाच प्रकारे आमिष दाखविण्‍यात येऊ शकते किंवा असे आमिष दाखविणारा एखादा दुरध्‍वनीही आला असेल. त्‍यास बळी पडू नका. विम्यावर कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून 20 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खासगी विमा कंपनीचा अधिकारी व एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवि महेशकुमार जोशी (रा. कृष्णमंगल अपार्टमेंट, चेतनानगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांना खासगी कंपनीचा विमा उतरविल्यास त्यावर तत्काळ दोन लाखांचे कर्ज काढून देण्यात येईल, असे आमिष दाखवित त्यांचा विमा काढण्यात आला. यापोटी 20 हजाराचा धनादेशही संशयितांनी स्वीकारला.

यानंतर काही दिवसांनी विमा कंपनीच्या अधिकारी-एजंटकडे कर्जाची विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अशोक जैन (रा. नवी दिल्ली) व महेश हिंगमिरे यांच्यासह एक साथीदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.