आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झलक 'इंटरक्लब जिम्नॅस्टिक'ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंत व्यायामशाळा आणि रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरतर्फे यशवंत व्यायामशाळेत आयाेजित इंटरक्लब जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. या स्पर्धेत महानगरातील १२ क्लबमधील १२० जिम्नॅस्ट सहभागी झाले आहेत.

गुरुवारपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ फिटनेस पाॅइंटचे संचालक नितीन शिरभाते मराठी साहित्य परिषदेचे डाॅ. धनंजय अहिरे यांच्या हस्ते झाला. शुभारंभानंतर जिम्नॅस्टपटूंचे संचलन आकर्षण ठरले. त्यानंतर राज्य राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टच्या प्रात्यक्षिकांना क्रीडारसिकांनी मनमुराद दाद दिली. त्यात राष्ट्रीय स्तरावरील नाशिकचे जिम्नॅस्ट रुची नेहते कपिल मुरुगकर यांनीही प्रात्यक्षिके सादर केली. मंगळवारी १२ वयाेगटातील प्रारंभिक सामने रंगले. त्यात नारायणी स्पाेर्ट‌्स, यशवंत व्यायामशाळा के. राकेश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. बुधवार गुरुवारी सायंकाळी ५.३० ला पुढील फेऱ्या रंगणार आहेत. स्पर्धा आयाेजनासाठी यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे, राकेश केदारे, प्रबाेधन डाेणगावकर दीपक उपासनी यांनी परिश्रम घेतले.