आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतरापूर्वीच हाेर्डिंग्जवर अवतरले इच्छुक उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पितृपक्षानंतर सुरू झालेल्या नवरात्राेत्सवाचा मुहूर्त साधून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या दिग्गजांनी हाेर्डिंग्जद्वारे अापल्या उमेदवाऱ्याच जणू जाहीर केल्या अाहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही मंडळी पक्षांतराच्या अाैपचारिक साेहळ्यापूर्वीच संबंधित पक्षाचे चिन्ह घेऊन थेट हाेर्डिंगवर अवतरले अाहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढायला सुरुवात झाली अाहे.
पितृपक्षात शुभकार्याला प्रारंभ करू नये असा ग्रह अनेक राजकीय पुढाऱ्यांमध्ये असल्याने महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ या मंडळींनी गणेशाेत्सवकाळातच करून घेतला अाहे. पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या काळात शुभकार्ये करू नयेत, अशी अनेकांची धारणा असल्याने अनेकांनी नवरात्राेत्सवाला प्रारंभ हाेताच महापालिका निवडणूकीच्या प्रचाराचा जाेरदार धडाका सुरू केला अाहे. यात हाेर्डिंग्ज, शुभेच्छापत्र, अारतीची छाेटेखानी पुस्तके याद्वारे नवरात्र अाणि दसऱ्याच्या शुभेच्छा नागरिकांना देतानाच त्यावर अापला फाेटाे अाणि पक्षाचे चिन्ह प्रसिद्ध केले अाहे.
शहरातील बहुसंख्य प्रभागांत सध्या हेच चित्र दिसत अाहे. सध्या एका पक्षात असलेल्या सदस्यांनी दुसऱ्या पक्षाचे चिन्ह घेऊन अवतरल्याची मजेशीर उदाहरणेही काही शुभेच्छापत्रकांवर बघायला मिळत अाहेत. यामुळे नागरिकांचे काही प्रमाणात मनाेरंजनही हाेत अाहे. पक्षांतराच्या साेहळ्यापूर्वीच शुभेच्छापत्रांवर झालेल्या या पक्षप्रवेशांनी रंगारंग चर्चेला उधाण अाले अाहे.
अपक्षअाणि छाेट्या पक्षांची ससेहाेलपट : चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे खरी ससेहोलपट ही अपक्ष आणि छाेट्या पक्षांची हाेणार अाहे. मोठ्या पक्षांना त्यांच्याजवळ असलेले नेटवर्क उपयोगात येऊ शकते. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना हे नेटवर्क आतापासून तयार करावे लागणार आहे. त्यातही जोवर प्रभाग जाहीर होत नाहीत तोवर नेटवर्क कुठे आणि कसे उभे करायचे, हादेखील मोठा प्रश्नच या पक्षांपुढे उभा ठाकला आहे.

भाजप, सेनेचे सर्वाधिक हाेर्डिंग्ज
भाजप अाणि शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी यंदा सर्वाधिक हाेर्डिंग्ज लावलेले दिसतात. त्यानंतर मनसे, काँग्रेस अाणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांचा नंबर लागताे.

शुभेच्छा फलकांवर पॅनलही जाहीर
यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने काही ठिकाणी हाेर्डिंग वा शुभेच्छापत्रांवर शुभेच्छुक म्हणून तीन किंवा चार इच्छुक उमेदवारांचे फाेटाे प्रसिद्ध करण्यात अाले अाहेत. महापालिका निवडणुकीचे पॅनलच जणू या हाेर्डिंग वा शुभेच्छापत्रांतून जाहीर करण्यात अाल्याची चर्चा यानिमित्ताने हाेत अाहे.

पक्षाचे चिन्ह टाकण्याची सावध भूमिका
महापालिकेच्या निवडणूकीसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच हाेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण सर्वच पक्षांमध्ये आधीपासूनच नंबर लावून बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत. या निवडणुकीत भाजप अाणि शिवसेनेत चुरस दिसेल, असे राजकीय विश्लेषक सांगत असले तरीही अन्य पक्षांनीही अपेक्षा साेडलेली नाही. ज्यांना शिवसेना अाणि भाजपची उमेदवारी मिळणार नाही ती मंडळी अन्य पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची चिन्हे अाहेत. या पार्श्वभूमीवर अशा इच्छुकांनी सावध भूमिका घेत शुभेच्छाफलकांवर पक्षाचा नामाेल्लेख टाळून केवळ अापले नाव टाकले अाहे.
बातम्या आणखी आहेत...