आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुसफूस जाणार राजदरबारी, गटनेते सातभाईंचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी उत्पन्नाचे स्राेत लक्षात घेऊन वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे साेडून मनसेचे पदाधिकारीही आता आयुक्तांचे समर्थन करू लागले आहेत. त्यामुळे नाराज नगरसेवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहेत. आपण साहेबांकडे दाद मागणार असल्याचे पक्षाचे गटनेते अशाेक सातभाई यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नगरसेवक निधी एक कोटी रुपयांवरून २० लाखांवर आणल्याने सातभाई यांनी त्याविरोधात आवाज उठवल्यावर महासभेत सर्वच नगरसेवकांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर महापौरांनी ५० लाखांपर्यंतचा निधी दिला. मात्र, त्याची अंमलबजावणी हाेत नसल्यामुळे शिवसेनेने मनसेला लक्ष्य केले होते. त्यानंतर मनसेतील नाराज नगरसेवकांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, साेमवारी (दि. २) ‘राजगड’ येथील बैठकीत पदाधिका-यांबरोबर नगरसेवकांचा संघर्ष झाला. महापाैरांनी सबुरीचा सल्ला घेण्याचे आवाहन केले असले तरी, नगरसेवकांची नाराजी कमी झालेली नाही. महापालिकेची परिस्थिती नाजूक असली तरी पुढील वर्षी चांगल्या पद्धतीने वसुली केली, तर दाेनशे ते तीनशे कोटींचे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे उगाच स्पील ओव्हरचा धाक दाखवून नगरसेवक निधीला कात्री लावण्याच्या प्रशासनाच्या खेळीला मनसेने का समर्थन द्यायचे, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. हीच बाब आता राज ठाकरे यांच्या कानावर नगरसेवक घालणार असून, त्यानंतर नगरसेवकांचा मोठा गट बाहेर पडू शकतो असेही सांगितले जाते.

पुढीलआठवड्यात राज नाशकात राजठाकरे हे फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात नाशिक दौ-यावर येण्याची शक्यता असून, या दौ-यात नगरसेवक आर्थिक परिस्थिती रखडलेल्या कामांबाबत पुन्हा त्यांच्याकडे गा-हाणे मांडण्याची शक्यता आहेत.

सभागृहनेतेमहापालिकेत रुजू : राजगडयेथील बैठकीत सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी आपल्याकडे नगरसेवक तक्रारी मांडतच नसल्याने पालिकेत येऊन उपयोग काय, असा सवाल केला हाेता. त्यावर नगरसेवकांनी तुम्ही हजर राहिले तर तक्रारी मांडता येतील, असा प्रतिप्रश्न केला होता. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पालिकेतील कामकाजाचा पुन्हा ताबा घेतला.