आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरची स्टंटबाजी अन् शेतकर्‍यांचे मनोरंजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात ड्यूज फाहर ट्रॅक्टर्सची विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आल्याने शेतकर्‍यांचे चांगलेच मनोरंजन झाले. सोमवारी ट्रॅक्टरच्या स्टॉलवर नोंदणीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. मिनी टेम्पो, लोखंडी कृषी अवजारांच्या चौकशीत शेतकरी बांधव व्यस्त होते.

धावपळीच्या जीवनात तरुण शेतकर्‍यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. शेती करण्यासाठी आता लहान शेतकर्‍यांपासून ते र्शीमंत शेतकर्‍यांपर्यंत ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टरच्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर शेतकर्‍यांची मोठी गर्दी दिसून आली. सोमवारी एका ट्रॅक्टरचालकाने विविध प्रात्यक्षिके दाखवून आपले उत्पादन चांगले कसे, हे सिद्ध केले. त्यावेळी शेतकर्‍यांचे चांगलेच मनोरंजन झाले. त्यानंतर अनेक शेतकर्‍यांनी चौकशी करून नोंदणी केली. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांनी विविध उत्पादनांसह शेतीमालाच्या वाहतुकीसाठी उपयोगी असणार्‍या मिनी टेम्पोबाबतही चौकशी केली.

पूर्वीच्या लाकडी नांगर, वखर, कोळपी, सारी यंत्रांना तिलांजली देऊन अनेकांनी लोखंडी अवजारांचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे एकाच यंत्रात अनेक अवजारांचा वापर व्हावा, या हेतूने काही कंपन्यांनी बहुउपयोगी अवजारे निर्माण केली आहेत. या यंत्राच्या चौकशी आणि खरेदीसाठी शेतकर्‍यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.