आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Business Infoturms Program In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय धोरणाचा निर्यातवाढीस फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्र सरकारने निर्यातवाढीवर भर देत सात कलमी परकीय व्यापार धोरण जाहीर केले आहे. निर्यात वाढीसाठी आगामी काळात याचा फायदा होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड अँग्रीकल्चरतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय व्यापारामधील इन्कोटर्मस’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.निर्यातीमध्ये 20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेला तोंड देण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनी जाहीर केलेल्या निर्यातपूरक धोरणामुळे निर्यातदारांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे कापडिया म्हणाले.
व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, ठाणे जनता सहकारी बॅँकेचे संचालक रमेश कनानी, प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक अजित शहा उपस्थित होते.