आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अाज सुरू हाेणार इंटरनेट सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बालिका अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अाता निवळली असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तीन दिवसांत ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शनिवार दुपारी संवेदनशील गावांत जिल्हाधिकारी, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांसह सशस्त्र संचलन करून बंदोबस्त शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती परिक्षेत्राचे पाेलिस महानिरीक्षक विनय चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शनिवारी दुपारपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार असून अातापर्यंत सात अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक धुमसण्याला पालकमंत्री जबाबदार : नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळेच नाशिकमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या अामदार नीलम गाेऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मुलीवर अत्याचाराची घटना झाल्यानंतर महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतरच नाशिक अशांत झाले. कायदेशीर प्रक्रियेचे पालन पालकमंत्र्यांनी करायला हवे होते, असेही त्या म्हणाया.
बातम्या आणखी आहेत...