आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interuniversity Player Would Be Involed In Service Sports Minister

आंतरविद्यापीठीय खेळाडूंना सेवेत घेऊ - क्रीडा मंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आंतर विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाद्वारे शासकीय सेवत सामावून घेतले जाईल, अशी घोषणा क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी रविवारी केली.
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. खेळाडूंनी आपला खेळ जोपासावा यासाठीच शासनाने हा निर्णय घेतला असून, त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. अहवाल सादर होताच कोटा लागू केला जाईल, असे आश्वासनही वळवी यांनी दिले.

राज्यस्तरापासून ते आंतराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना शासकीय सेवत 5 टक्के आरक्षणाद्वारे संधी दिली जाते. मात्र महाविद्यालयीन स्तरावरील दर्जेदार खेळाडूंना केवळ बक्षीसे व शिष्यवृत्ती दिली जाते. इतर लाभापासून ते वंचित राहतात. त्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. क्रीडा धोरणातही सर्वच स्तरावरी खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले.