आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसवणं हाच माझा छंद...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘महिलांना मोकळं हसायला लावणं हा माझा छंदच आहे. हसा आणि हसवा याशिवाय जीवनात दुसरा आनंदच नाही,’ असे सांगत अत्यंत खुमासदार शैलीत कधी विनोदाचे फटकारे मारत, तर कधी गंभीर पण तितकेच मजेशीर किस्से सांगत प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाशिककर महिलांशी अत्यंत दिलखुलास संवाद साधला. त्याचबरोबर त्यांना योग्य व्यायाम करणं, वेळेवर खाणं आणि आयुष्यात सतत हसतमुख राहण्याचा सल्लाही दिला.

नाशिक- शंकराचार्य संकुल येथे ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा क्लबतर्फे आयोजित ‘ती’चं आकाश’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी महिलांशी दिलखुलास संवाद साधला. प्रसिद्ध मुलाखतकार उत्तरा मोने यांनी गुप्ते यांना तितक्याच मनमोकळ्या प्रश्नांनी बोलते करीत संवादाचा सेतू बांधला. दरम्यान, महिलांना उलट्या अक्षरक्रमात गाणे सादर करून दाखवतानाच आरोग्यविषयक, आनंदी जीवनाच्या टिप्सही त्यांनी दिल्या. या वेळी दर्जाहीन मालिकांबद्दल विचारले असता त्यांनी अलीकडच्या काही मालिकांविषयी खंत व्यक्त केली.

शो मस्ट गो ऑन
कलाकाराचे आयुष्य किती खडतर असते, अनेक भावनिक संघर्षांना त्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागते, हे सांगताना त्यांनी बहिण भारती आचरेकरांचे पती गेले त्याच दिवशी विनोदी नाटकांचे दोन प्रयोग दुहेरी मानसिक कसरत करत कशाप्रकारे सादर केले, ते सांगितले. शेक्सपिअरने 800 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ‘शो मस्ट गो ऑन’ या विधानानुसार मी इतकी वर्षे हा खडतर प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.