आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तरीही बाबांनी सोडले नव्हते समाजसेवेचे व्रत, प्रकट मुलाखतीत डाॅ. अामटे यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बाबा अामटे शिस्तप्रिय हाेते. कृष्ठराेग्यांची सेवा करण्यास सुरुवात केल्यानंतर अामच्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले. मात्र, बाबांनी समाजसेवेचे व्रत साेडले नाही, असे स्पष्टीकरण मॅगसेसे पुरस्कार विजेते डाॅ. प्रकश अामटे यांनी ‘िनमा’च्या वतीने अायाेजित प्रकट मुलाखतीत िदले.
गंगापूरराेडवरील थोरात सभागृहात नॅशनल इंिटग्रेटेड मेडिकल असाेसिएशन नाशिक शाखेचा पदग्रहण साेहळा डाॅ. प्रकाश अामटे डाॅ. मंदाताई अामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर डाॅ. मनीष जाेशी डाॅ. प्रणीता गुजराथी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
कृष्ठराेग्यांची सेवा म्हणजे मूर्खपणा असल्याचे समाजाने नातेवाइकांनी म्हटले. बाबा मात्र निर्णयावर ठाम राहिले. त्या काळी कृष्ठराेग्यांबाबत बरेच गैरसमज असल्याने बाबांना उपचार करण्यासाठी डाॅक्टर िमळत नव्हते. तेव्हाच ठरविले अापणही डाॅक्टर हाेऊन बाबांचे कार्य चालू ठेवायचे ते अाजही सुरू अाहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमाचे (नॅशनल इंिटग्रेटेड मेडिकल असाेसिएशन) राज्य सचिव डाॅ. शैलेश िनकम हाेते. तर, व्यासपीठावर पाेलिस अायुक्त कुलवंतकुमार सरंगल, महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण वाणी यांनी केले.
यांनी स्वीकारला पदभार
डाॅ.भूषण वाणी (अध्यक्ष), डाॅ. राहुल पगार (उपाध्यक्ष), डाॅ. िवनायक खैरे, डाॅ. िकशाेर गाडगीळ, डाॅ. शरद पाटील, डाॅ. जयश्री सूर्यवंशी, डाॅ. दीपक पाटील, डाॅ. िनशांत पाटील, डाॅ. दर्शन घाेगड, डाॅ. िनतीन हाते, डाॅ. प्रवीण बाेरा, डाॅ. दीपक रावतळे, डाॅ. समीर लासुरे, डाॅ.राजेंद्र खरात अादी.