आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणे जमीनदाेस, द्वारकावरील शंभरहून अधिक लहान-माेठ्या अतिक्रमणांवर बुलडाेझर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकरोड पाठोपाठ आता संपूर्ण शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात असून, गुरुवारी द्वारका चौक ते तिगरानिया चाैफुली हा सर्व्हिसराेड महापािलकेने अतिक्रमण माेहीम राबवत माेकळा केला.

गेल्या अनेक दिवसांपासून या सर्व्हिसराेडवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले हाेते. हे दूर करावे, अशी मागणीही हाेत हाेती. दरम्यान, गुरुवारी पाेलिस ताफ्यात ही कारवाई करण्यात अाली. या कारवाईत परिसरातील शंभरहून अधिक छोटे-मोठे अतिक्रमण काढण्यात आले. महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देता मोहीम राबविल्याने अतिक्रमणधारकांकडून या मोहिमेचा विरोध झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. नाशिकरोड परिसरात काही दिवसांपूर्वीच जोरदार अतिक्रमण मोहीम राबविण्यात आल्याने गुरुवारी शहराचे मुख्यद्वार समजले जाणारे द्वारका परिसरात मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई झाली. मोहिमेची सुरुवात सकाळी द्वारका बसस्थानकापासून करण्यात आली. यानंतर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाकडे जाणाऱ्या सर्व्हिसरोडवरील अतिक्रमण हटविण्यात अालेे. रस्त्याच्या दाेन्ही बाजूने करण्यात अालेल्या या कारवाईत हजरत घोडे सवार बाबांच्या दर्ग्यापासून तर थेट द्वारका हॉटेलपर्यंतचे सर्वच नवीन-जुने अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसल्याने अतिक्रमणधारक प्रशासन अधिकाऱ्यांवरच अाक्रमक झाले. यावेळी सहायक आयुक्त एस. बी. वाडेकर, पूर्व विभागीय अधिकारी मालिनी सिरसाठ, सहायक अधीक्षक जी. टी. गवळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण आदी उपस्थित होते.

अशीहीचर्चा : परिसरातीलअतिक्रमणांवर प्रशासनातर्फे लाल खुणा केलेल्या असतानाही त्यावर कारवाई करण्यात आल्याने दुकानदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
खासगी जागांवरही हातोडा
तिगराानियाचौकातील घोडे सवार बाबा यांच्या दर्ग्याजवळील बोहरा सोसायटीची खासगी मिळकत असतानाही त्या ठिकाणी असलेल्या दुकानांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आल्याने बोहरा समाजाच्या वतीने मोहिमेचा निषेध करण्यात आला. तर स्टेट बँकेजवळील बलबीरसिंग सद्दू यांच्या मालकीचे दुकानदेखील काही बोलण्याच्या आतच जमीनदोस्त करण्यात आल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.

या संपूर्ण माेहिमेदरम्यान विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांच्यावर एका कर्मचाऱ्याने सतत छत्र धरल्याचे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत हाेते. महापालिकेचे अायुक्त अन्य माेठे अधिकारीही असा बडेजाव दाखवत नसल्याने या प्रकाराची चर्चा रंगली.

हा तर अन्याय..
आमच्या मालकीच्या जागेवर गेल्या दहा वर्षांपासून आम्ही व्यवसाय करीत आहाेत. मात्र, आज अचानक कोणत्याही प्रकारची माहिती देता आमची दुकाने तोडण्यात आली. हा आमच्यावर अन्यायच आहे. -बलबीरसिंग सद्दू, व्यावसायिक