आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या नातलगाच्या विवाहास गेल्याने गिरीश महाजन वादात, मुख्यमंत्र्यांचे चाैकशीचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/मुंबई/पुणे - अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या नाशिकमध्ये झालेल्या लग्न साेहळ्यास उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व तीन भाजप अामदारांची चाैकशी करावी, अशी मागणी काॅंग्रेस- राष्ट्रवादीकडून हाेत अाहे.
 
दरम्यान, नाशिकचे काही पाेलिस अधिकारीही या साेहळ्यास उपस्थित हाेते. त्यांची चाैकशी करण्याचे अादेश नाशिकच्या पाेलिस अायुक्तांनी यापूर्वीच दिले अाहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाेलिस अायुक्तांना या प्रकरणाचा चाैकशी अहवाल सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. दुसरीकडे, काॅंग्रेस- राष्ट्रवादी काॅंग्रेसने महाजन व भाजपच्या तीन अामदारांच्या राजीनाम्याची मागणी केली अाहे.
 
उद्याेगपती जकी काेकनी याच्या मुलीचा १८ मे राेजी नाशिकमध्ये थाटात विवाह साेहळा झाला. जकी काेकनी हा अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर खून, सट्टेबाजी प्रकरणी काही गुन्हेही दाखल अाहेत.  सूत्रांच्या माहितीनुसार, काेकनीची पत्नी व दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची पत्नी या दाेघी सख्खी बहिणी अाहेत. त्यामुळे या लग्न साेहळ्यात अंडरवर्ल्डशी संबंधित काही लाेकही सहभागी झाले हाेते. तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे तीन अामदार अनुक्रमे देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप व सीमा हिरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सहायक पाेलिस अायुक्त व नऊ पाेलिस उपनिरीक्षकही या विवाह साेहळ्यात गेले हाेते. पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल यांनी या अधिकाऱ्यांची  चाैकशी सुरू केली अाहे.

गिरीश महाजन यांचा राजीनामाच घ्यावा
दाऊदशी काडीचाही संबंध नसताना त्यावेळी शरद पवारांची यापूर्वी उगीच बदनामी केली गेली. आता भाजपचे मंत्री दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला जातात त्यावर मात्र थातूरमातूर उत्तरे दिली जातात.  हे लग्न कोणाचे होते याची माहिती महाजनांना नव्हती का? जी चूक झालीय त्यासाठी महाजन यांनी खरे तर सत्ता साेडायला हवी. तसेच  प्रायश्चित्तही घ्यायलाच हवे.
- अजित पवार, ‘राष्ट्रवादी’चे नेते  

‘ते’ काेणाचे नातेवाईक हे मला माहिती नव्हते
- मंत्री असल्याने  अनेक लग्नांमध्ये जात असताे. एका धर्मगुरुंनी या विवाहाचे मला अाग्रहाचे निमंत्रण दिले हाेते. कुंभमेळ्यापासून त्यांचा माझा परिचय हाेता. मात्र विवाह काेणाचा हाेता याची कल्पना नव्हती. विराेध अाराेप करतच असतात. मात्र या प्रकरणी काेणतीही चाैकशी करावी मी त्यास सहकार्य करेल.
गिरीश महाजन, जलसंपदामंत्री.  
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, त्‍या लग्‍नातील फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...