आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटाबदलीप्रकरणी महंत सुधीरदास अायकर चौकशीच्या फेऱ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक | काेट्यवधी रुपयांच्या नाेटाबदलीप्रकरणी अायकर खात्याने स्थानिक पाेलिसांच्या मदतीने रविवारी रात्री उशिरा काळाराम मंदिराचे माजी विश्वस्त तथा महंत सुधीरदास पुजारी अाणि छावा संघटनेचे पदाधिकारी विलास पांगारकर यांची सलग चार तास चाैकशी केल्यानंतर अाता पुन्हा मंगळवारी या दाेघांना चाैकशीसाठी अायकर कार्यालयात हजर राहण्याचे अादेश दिल्याचे समजते. या प्रकरणात संबंधित रक्कम ही एका बड्या कांदा व्यापाऱ्याची असल्याची भूमिका संशयितांनी घेतल्याने या व्यापाऱ्याचीही चाैकशी हाेण्याची चिन्हे अाहेत. दरम्यान, या प्रकरणी अायकर विभागाने ताब्यात घेतलेली ही राेकड नेमकी काेणाच्या मालकीची अाणि काेणत्या बँकेतून या नाेटा वितरित झाल्या अाहेत, याची सखाेल चाैकशी केली जात अाहे.
रविवारी रात्री शहरातील एका हाॅटेलमध्ये नाेटा बदल करण्यासाठी काही प्रतिष्ठित मंडळी अाल्याच्या माहितीवरून अायकर विभागाने सापळा रचून महंत अाणि राजकीय पदाधिकाऱ्यास नाेटांसह चाैकशीसाठी तात्पुरते ताब्यात घेतले. त्यानंतर अायकर विभागाने त्यांची चौकशी केली. दाेघांच्या उत्पन्नाचे स्रोताची माहिती घेऊन त्यांना सोडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...