आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या उत्पन्नप्राप्तीसाठी धोका पत्करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोणत्याही गुंतवणुकीत धोका असतोच; पण कोणी तो जास्त पत्करतो तर कोणी कमी. यातूनच नफ्याचे प्रमाणही कमी-जास्त असते. म्हणूनच, उत्तम परतावा मिळवायचा असेल तर डोळसपणे धोका पत्करावा, असे प्रतिपादन कोटक म्युच्युअल फंडच्या उपाध्यक्ष स्नेहल दीक्षित यांनी केले.

इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित ‘गुंतवणूकीची गुरूकिल्ली’ या कार्यक्रमात त्या म्हणाल्या, ‘‘गुंतवणूक करताना वय, उत्पन्न, जबाबदार्‍या, गुंतवणूक कुठे-किती करायची याचा विचार करण्याची गरज आहे. म्युच्युअल फंड, रियल इस्टेट, सोने, एफडी यांसारख्या विविध पर्यायांत पैसे गुंतवा. बँका किंवा विविध फंडांच्या पेन्शन प्लॅन्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. गुंतवणूक सल्लागाराचा सल्लाही महत्त्वाचा आहे.

म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. प्रत्येक अँसेटच्या बेंचमार्कपर्यंत (र्मयादा) पैसे कमवायचे असतात.

म्युच्युअल फंडात उत्पन्न अनिश्चित

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने यामागे किती परतावा दिला, हे निश्चित आकडेवारीसह सांगता येते; मात्र पुढे किती परतावा मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. ते सर्वथा शेअर बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असते. म्हणूनच चांगले प्रदर्शन राहिलेल्या फंडात गुंतवणूक करणे सर्वथा योग्य असते.

म्युच्युअल फंडाचे फायदे

म्युच्युअल फंडाला गुंतवणुकीतून मिळणारा नफा वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येक फंडाकडे व्यावसायिक व्यवस्थापक असतात. वेगवेगळ्या गुंतवणूक उत्पादनांत पैसा गुंतविला जातो. त्यामुळे परतावा मिळतोच. व्यवहारात पारदर्शकता असते. लवचिकता असल्याने हवी तेव्हा योजना किंवा पर्याय बदलता येतो.

सोने सदासर्वदा उत्तम

हुकमी पैसा म्हणून सोने गुंतवणूक चांगली आहे. गोल्ड फंडस् किंवा गोल्ड इटीएफ यातून पैसा गुंतवल्यास बाळगण्याची जोखीम टळते. गुंतवणूकदाराला कागदी सोने मिळते. वध-घट नसते. सोने गुंतवणूक मात्र काळाची गरज आहे.

विमा हवाच

नोकरीला लागल्यानंतर निश्चित कालावधीची विमा पॉलिसी घ्यायलाच हवी. यातून मुदतपूर्तीनंतर पैसा परत मिळत नसला तरी मृत्युपश्चात कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. मेडिक्लेम, इन्श्युरन्स पॉलिसी ही काळाची गरज आहे.