आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irregular Electricity News In Marathi, News In Marathi

खंडित वीजपुरवठय़ामुळे शहरवासीयांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महावितरण कंपनीकडून शनिवारी (दि. 26) सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शहरात विविध भागात तांत्रिक कामांच्या दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांची काही काळ गैरसोय झाली होती.

वासननगर, नाग चौक, रामकुंड परिसर, पंचवटी कारंजा, निमाणी, राणेनगर, चार्वाक चौक, आदश्र सोसायटी, गीतांजली कॉलनी या परिसरात महावितरण कंपनीने फीडर, वीजतारा, खांब, ऑइल तपासणी अशा विविध तांत्रिक कामांसाठी वीजपुरवठा खंडित केला होता. तसेच, अंबड औद्योगिक परिसरातील प्लॉट क्रमांक 10 ते 16 आणि प्लॉट ए आणि बी, पी, आय, के, एन, डब्ल्यू, एस, सी, एल, एक्स यांचा वीजपुरवठा सकाळी 9 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत खंडित केला होता.
तांत्रिक कामांसाठी वीज खंडित
शनिवारी औद्योगिक परिसरातील कंपन्यांना सुटी असल्याने या भागातील तांत्रिक कामांसाठी वीजपुरवठा खंडित केला होता. वृत्तपत्रांतून ही माहिती देण्यात आली होती. वैदेही मोरे, जनसंपर्क अधिकारी