आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिव्हिलच्या ओपीडीतील रुग्णांना राेजच डाॅक्टरांची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जिल्ह्याच्या अारोग्यसेवेची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र, या बाह्यरुग्ण विभागात डाॅक्टर वेळेवर हजर राहात नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी ‘डी.बी. स्टार’कडे केल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर बाह्यरुग्ण विभागास भेट दिली असता, सकाळी साडेआठ वाजेची वेळ असतानादेखील वेळेवर एकही डाॅक्टर हजर नव्हते. नेत्रराेग, अस्थिराेग यांसारख्या इतर अनेक विभागांत रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून, त्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत अाहे.

डॉक्टरराउंडला गेले आहेत, थाेडे थांबावे लागेल ओपीडीच्या प्रत्येक विभागात ‘डी. बी. स्टार’च्या प्रतिनिधीने सकाळच्या सुमारास पाहणी केली असता एकही डॉक्टर हजर नसल्याचे िदसून अाले. मात्र, उपचारासाठी अालेल्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक मिनिटाला वाढच होत होती. ‘डॉक्टर कधी येणार’ याबाबत चौकशी केली असता ‘डॉक्टर राउंडला गेले आहेत, येतील थोड्या वेळाने’ असे सांगण्यात आले. दरम्यान, अन्य वाॅर्डस‌्मध्ये पाहणी केली असता एकाही वाॅर्डमध्ये अथवा ओपीडीच्या इतर कुठल्याही विभागात डॉक्टर नसल्याचे िदसून अाले. यावरून मग डाॅक्टर्स जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित हाेत असून, या डाॅक्टरांच्या वेळेत हजर राहण्याच्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळीवाजेपासून लागतात विभागात रांगा...
जिल्हाभरातून उपचारासाठी अनेक रुग्ण सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयात दाखल हाेत असतात. यात बहुतेक रुग्ण त्यांच्यासाेबत आलेले नातेवाइक कामावर सुटी घेऊन सकाळी आठ वाजताच येऊन बसलेले असतात. तातडीने उपचार होतील, या अाशेने येणाऱ्या रुग्णांना मात्र डॉक्टराच्या प्रतीक्षेत तासन‌्तास बसावे लागत असल्याचे िचत्र येथे नित्याचेच झाले अाहे. मात्र, याबाबत कोणालाही विचारणा हाेत नसल्याने सर्वच विभाग अाणि याठिकाणी दाखल हाेणारे रुग्ण वाऱ्यावर आहेत.

रुग्णांचा विचार करावा
ग्रामीणभागातून अनेक गरीब, कष्टकरी पैसे कमी लागतील, यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. याचा विचार करून डॉक्टरांनी वेळेवर हजर व्हायला हवे. उषाबाई पाटील, नागरिक

..पण करणार काय?
पायालामाेठी जखम झाली असून, असह्य वेदना हाेत असल्याने उपचारासाठी सकाळी आठ वाजताच आलो. मात्र, एक तास उलटूनही डॉक्टराच्या येण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. - बबनमहंती, रुग्ण

जखमी रुग्णांनाही पर्याय नाही...
अाेपीडीतजखमी अवस्थेत अालेल्या रुग्णांना देखील कित्येक वेळ तशाच अवस्थेत बसून राहावे लागते. अनेकदा वेळेवर उपचार झाल्याने रुग्णांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते.
चिमुकल्यांसह वयाेवृद्ध, अंध-अपंगांनाही कित्येक वेळ प्रतीक्षा करीत बसून राहावे लागते.

याकडेही लक्ष देण्याची गरज
ओपीडीच्याप्रत्येक विभागात सकाळपासून ट्यूबलाइट्स, पंखे सुरू केले जातात. मात्र, त्या विभागात कोणीही नसतानाही ही उपकरणे सुरूच ठेवली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय होत असतो. विजेच्या या अपव्याकडेही वरिष्ठांनी लक्ष दिले, तर मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होऊ शकते.

संसर्ग पसरण्याची भीती अधिक
सकाळपासूनचरांगा लावून बसलेल्या रुग्णांची संख्या वाढतच असते. त्यात संसर्गजन्य आजाराने वेढलेेले रुग्णही असल्याने इतरांनाही त्यांचा त्रास हाेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांची तातडीने तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी पाठविणे अपेक्षित असताना तसे हाेत नाही. डॉक्टर येईपर्यंत या ठिकाणीच बसून राहण्याशिवाय पर्याय उरत नाही.

वयोवृद्ध,अपंगांचेही हालच
याठिकाणी उपचारासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, अपंग, विविध व्याधीने त्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश असताे. मात्र, त्यांनाही डॉक्टर वेळेवर येत नसल्याने प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नसते. या प्रकारामुळे त्यांच्या वेदनेत अधिक भर पडत असतानाही या डाॅक्टरांकडे दुर्लक्षच केले जात अाहे.

आेपीडीच्याकमी वेळेमुळे नागरिकांची गैरसाेय
जिल्हारुग्णालयाच्या ओपीडीत कमी दरात उपचार होत असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, सकाळी साडेआठपासून सुरू होणारी ओपीडी साडेबारापर्यंतच असते. या वेळेच्या बंधनामुळे अनेक रुग्णांचे हाल होत असल्याने आेपीडीची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
डाॅ. जी. एम. हाेले, अतिरीक्तजिल्हा शल्यचिकित्सक
बातम्या आणखी आहेत...