आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांतील वृक्ष काढा, अपघात टाळा, रस्त्यांत येणारी झाडेच झाली ‘अपघातप्रवण क्षेत्र’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी..’ म्हणत शहरात झाडांची जाेपासना करण्याचे उल्लेखनीय काम काही पर्यावरणवादी संस्था अाणि नागरिक करीत अाहेत. या प्रयत्नांतून अाजवर हजाराे झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात अाले अाहे. परंतु, महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पर्यावरणप्रेमींना काही वर्षांपासून अाक्रमक भूमिका घ्यावी लागत अाहे. कुंभमेळ्यासाठी ४०० काेटी रुपये खर्च करून शहरात तयार करण्यात येणाऱ्या ८६ किलाेमीटरच्या रस्त्यांसाठी महापालिकेने मध्यंतरी हजार ६१३ झाडे ताेडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. त्यासाठी पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेण्यात अाले नाही. शिवाय, त्यातील किती झाडे वाचविता येऊ शकतात, याचाही प्रशासनाने विचार केला नाही. परिणामी, वृक्षप्रेमींच्या नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेनुसार मध्यंतरी न्यायालयाने मुख्य वनसंरक्षकांच्या उपस्थितीत त्रिसदस्यीय समिती नेमून वृक्षप्रेमींच्या हरकतीही नाेेंदवून घेतल्या. न्यायालयाच्या स्थगितीमुळे शहरातील रस्त्यांच्या बाजूची झाडे ताेडण्यास सध्या मज्जाव अाहे.
माेठेरस्ते, धाेकेदायक वृक्ष, अंधाराचे साम्राज्य
सिंहस्थकुंभमेळ्यासाठी सध्या अंतर्गत, मध्य तसेच बाह्य अशी तीन रिंगरोडची कामे प्रगतिपथावर आहेत. सिंहस्थ आराखड्यांतर्गत महापालिकेने आतील लिंकरोडचे २४ किलाेमीटरचे काम प्रस्तावित केले होते. त्यातील १८.६० किलाेमीटरचे काम महापालिकेने सुरू केले आहे. या सर्वच रस्त्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे ताेडण्याचे पालिका प्रशासनाने प्रस्तावित केले. मात्र, रस्त्यांच्या कामांसाठी झाडे ताेडण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती िदली अाहे. परंतु, ‘सर्वांना एकच न्याय’ या तत्त्वामुळे नागरिकांसाठी धाेकेदायक ठरणारी झाडेही सध्या नव्या रस्त्यांच्या मधाेमध उभी अाहेत. या रस्त्यांची कामे सुरूच असून, अद्याप पथदीप लावलेले नसल्याने रात्रीच्या वेळी ही झाडे िदसत नाहीत. परिणामी, रस्त्यात येणाऱ्या झाडांवर अादळून लहान-माेठे अपघात हाेत अाहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवघेण्या ठरलेल्या झाडांसंदर्भात तरी पालिका प्रशासन पर्यावरणप्रेमींनी समन्वयाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
नियमांना बगल
सरळवाढणारी झाडे रस्त्याच्या कडेला १२ फूट, तर अन्य झाडे िकमान २० फूट अंतरावर असावीत, असा नियमच असताना शहरात सध्या रस्त्याच्या मध्यभागी झाडे दिसत अाहेत. अपघात टाळण्यासाठी केलेल्या झाडांच्या नियमावलीलाच सध्या छेद दिला जात असल्याने संबंधित परिसरात वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत अाहे.