आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणावरील बोटिंगला कराराची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आघाडीसरकारच्या विशेषत: माजी पर्यटन विकासमंत्र्यांच्या स्वप्नातील गंगापूर धरणावरील बोट क्लबचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील परवानग्याही मिळाल्या आहेत, परंतु पाटबंधारे विभाग आणि पर्यटन विभाग यांच्यातील करारावर शासनाची मोहोर लागणे बाकी असल्याने धरणावरील बोटिंग सेवाही याच कराराच्या प्रतीक्षेत अडकली आहे. करारास शासनाने परवानगी देताच दोन दिवसांतच एमटीडीसीला हस्तांतरित करण्यासह बोट क्लबवर पहिल्या टप्प्यातील मॅन्युअल बोट्सद्वारे बोटिंगलाही सुरुवात करण्याचा मानस पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. या ठिकाणी 18 बोटी दाखल झाल्या आहेत.
गंगापूर धरणावरील बोट क्लब इमारतीसह बांधकाम पूर्ण झाले आहे. बोटीही धरणांवर दाखल झाल्या आहेत. केवळ बोट क्लबच्या उद‌्घाटनाची प्रतीक्षा आहे. पर्यावरणप्रेमी पक्षीप्रेमींच्या विरोधामुळे हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता वाढली होती. त्यानुसार प्रशासनाने यातून मार्ग काढत येथे प्रदूषणरहित बोटींनाच परवानगी दिली आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बोटींचाच तेथे वापर करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले अाहे. त्यानंतर प्रकल्प पूर्णही झाला आहे. परंतु, आता त्यावर नियंत्रण ठेवणारे पाटबंधारे विभाग आणि पर्यटन विकास महामंडळ यांच्यातील करार अंतिम होणे बाकी आहे. प्रस्ताव शासनास सादर असून, पाटबंधारे विभागाच्या वतीने तो अंतिम करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे गंगापूर धरणावरील बोट क्लबचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी प्रतीक्षा आहे ती आता क्लबच्या उद‌्घाटनाची. गंगापूर धरणावरील बोट क्लबची उभारणी पूर्ण झाली आहे.

करारानंतर बोट क्लबचे हस्तांतर
एमटीडीसीला हा प्रकल्प लागलीच हस्तांतरित करू शकतो. परंतु, एमटीडीसी पाटबंधारे विभागात याबाबत होणाऱ्या कराराचा प्रस्ताव शासनाला दिला असून, त्याला अंतिम स्वरूप मिळणे बाकी आहे. परवानगी मिळताच पहिल्या टप्प्यात मॅन्युअल बोट त्यानंतर इतर बोटी टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर इतर बोट्सही उपलब्ध होतील. एस.के. बाफणा, कार्यकारीअभियंता, पाटबंधारे विभाग